हॅमिल्टन (न्यूझीलंड): न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात भारताला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताने टी ट्वेण्टी मालिकाही 1-2 ने गमावली. या पराभवाचं शल्य भारतीय क्रिकेटप्रेमींना असलं, तरी टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) देशप्रेम पाहून क्रिकेटप्रेमींचा उर देशप्रेमाने भरुन आला. भारताला या सामन्यात 213 धावांचं लक्ष्य होतं, मात्र भारताला 20 षटकात 208 धावाच करता आल्या.
या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील धोनीचं देशप्रेम पाहून तुम्ही आम्ही सगळेच त्याला कडक सॅल्युट करतील. धोनीचं प्रसंगावधान, चाणाक्ष बुद्धीमत्ता केवळ क्रिकेटदरम्यानच पाहायला मिळते असं नाही, तर त्याची प्रचिती वेळोवेळी येत असते. कालच्या सामन्यादरम्यान धोनीने भारताच्या तिरंग्याची शान राखली.
मैदानात नेमकं काय झालं?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान, धोनीचा एक फॅन तिरंगा घेऊन मैदानात घुसला. सुरक्षाकवच तोडून तो धोनीच्या दिशेने धावत आला. धोनी त्यावेळी विकेटकीपिंग करत होता. तो फॅन आला आणि तिरंग्यासह धोनीच्या पाया पडू लागला. त्याचवेळी भारताचा तिरंगा खाली जमिनीवर टेकणार होता, इतक्यात धोनीने आधी तिरंगा हातात घेतला. त्यानंतर मग आलेल्या फॅनला उठवलं.
धोनीचं हे देशप्रेम पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष करुन धोनीबद्दल आदर व्यक्त केला. या सामन्याची कॉमेंट्री करणाऱ्यांनीही धोनीच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं. ज्या वेगाने धोनी स्टम्पिंग करुन एखाद्या फलंदाजाला बाद करतो, त्याच वेगाने धोनीने तिरंगा उचलला.
धोनीचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाईक्स मिळवत आहे.
VIDEO:
Whenever you see this man Respect always for his ideology and him
MS Dhoni rescued the flag when it was about to touch his feet. Respect ????@msdhoni#Respect #Dhoni #INDvNZ pic.twitter.com/EXQwSG2pTX— Jitendra Sain (@Jitendra_Sain_) February 11, 2019
Tht’s M.S.D. for You..#Respect for National Flag ?? ..❤
Must watch & Retweet..#JaiHind #Dhoni #Mahi
Retweet guys.. pic.twitter.com/3J2bh3Pftb— Loco (@LocoLaddoo) February 11, 2019