मुंबई : मुंबईत क्रिकेटच्या सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित MCA ने ही मागणी केली आहे. (MCA Letter to CM Uddhav Thackeray Demand to Give Permission For Practice Cricket)
“मुंबई, ठाणे, खारघर, पालघर यांसह विविध भागातून अनेक खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेटचा सराव करतात. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक तरुण खेळाडू सरावापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम होत आहे. आपले करिअर वाया जाईल या भीतीने अनेक खेळाडू चिंताग्रस्त आहेत.”
“या मानसिक कोंडीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रिकेटच्या सरावाची परवानगी द्यावी,” असे संघटनेने या पत्रात म्हटले आहे. अनेक तरुण खेळाडूंच्या करिअरवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून संघटनेने हा पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा – BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरापर्यंत कोरोनाची मजल
“क्रिकेटच्या सरावादरम्यान सरकारने दिलेल्या अटी शर्तीचं पालन केले जाईल. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंना सरावाची परवानगी देण्यात यईल,” असे या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्व खेळाडूंचे लक्ष लागले आहे. (MCA Letter to CM Uddhav Thackeray Demand to Give Permission For Practice Cricket)
Mumbai Cricket Association today decided to donate Rs.50 lakhs to the Chief Minister’s Relief Fund towards the fight against Coronavirus. Mumbai Cricket Association will support the Govt. of Maharashtra in any way possible in its fight against this pandemic.
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) March 26, 2020
संबंधित बातम्या :
Electricity Bill | लॉकडाऊनमधील 50 टक्के वीज बिल माफ करा, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी