दुबई : सिक्स म्हटलं की आठवतो तो ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल. गेल (Universal Boss Chris Gayle) म्हणजेच सिक्स आणि सिक्स म्हणजेच गेल हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गेल मैदानात आला की विरोधी संघ आपोआप दबावात येतो. गेल आपल्या खेळीत नेहमीच 60-70 टक्के धावा या चौकार-षटकारांनी पूर्ण करतो. गेलने नुकतेच टी 20 क्रिकेटमध्ये 1000 सिक्स मारण्याची कामगिरी केली. पण सिक्सच्या बाबतीत मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने (Mumbai Indians Ishan Kishan) अनेक हार्डहिटर फलंदाजांना पछाडत विक्रमाला गवसणी घातली आहे. Mumbai Indians’ Ishan Kishan holds the record for most sixes in IPL 2020
इशानने आयपीएलच्या यंदाच्या 13 व्या मोसमात सर्वाधिक सिक्स मारण्याचा मान पटकावला आहे. गुरुवारी 5 नोव्हेंबरला दिल्ली विरुद्ध क्वालिफायर 1 सामना खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इशान किशनने या 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिक्सर खेचला. इशानने या सिक्ससह अर्धशतक पूर्ण केलं. तसेचं 13 व्या मोसमात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. इशानच्या नावावर यंदाच्या मोसमात आतापर्यंत 29 सिक्स लगावले आहेत.
2️⃣7️⃣ ? Ishan Kishan has now smashed the most sixes for any player this season ?
Upping the ante when we need it the most ?
Live Updates: https://t.co/l3TXUHmhAw
Ball-by-ball: https://t.co/7oZx1rfAYU#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvDC @ishankishan51 pic.twitter.com/QgFgtHYbA6— Mumbai Indians (@mipaltan) November 5, 2020
सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत ख्रिस गेलचा टॉप 5 मध्येही समावेश नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन आहे. संजूने या मोसमात 26 षटकार खेचले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आहे. पंड्याने या मोसमात एकूण 25 सिक्स मारले आहेत. पंड्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 5 सिक्स ठोकले.
इशानने या मोसमात 13 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 144.17 च्या स्ट्राईक रेटने तसेच 53.66 च्या सरासरीने 12 डावांमध्ये 33 चौकार आणि 29 षटकारांसह 483 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. इशानची 99 ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
ख्रिस गेलला यंदाच्या मोसमात पंजाबकडून उशीरा संधी देण्यात आली. जवळपास आयपीएलचा अर्धा टप्पा संपल्यानंतर गेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. या मोसमात गेलने 7 सामने खेळले यामध्ये त्याने 137.14 च्या स्ट्राईक रेटने 288 धावा केल्या. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. गेलने या मोसमात एकूण 23 सिक्स आणि 15 चौकार लगावले. दरम्यान पंजाबचे यंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्टात आले आहे.
मुंबईने दिल्लीवर 57 धावांनी मात करत अंतिम सामन्यात धडक मारली. दिल्लीला पराभवानंतरही अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आज (6 नोव्हेंबर) एलिमिनेटर सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यातील विजयी संघाची क्वालिफायर 2 सामन्यात गाठ पडणार आहे.
संबंधित बातम्या :
Chris Gayle | षटकारांचा बादशाह ख्रिस गेलचा नवा विक्रम, T20 मध्ये एक हजार षटकार ठोकणारा पहिला फलंदाज
Chris Gayle | रागाच्या भरात बॅट फेकणाऱ्या ख्रिस गेलकडून नियमांचं उल्लंघन, दंडात्मक कारवाई
Mumbai Indians’ Ishan Kishan holds the record for most sixes in IPL 2020