चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL-14) चौदाव्या मोसमाचं बिगुल आजपासून म्हणजेच 9 एप्रिलला वाजणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रेड आर्मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर (MA Chidambram Stadium Chennai) खेळविण्यात येणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स ही सर्वांत यशस्वी टीम आहे. परंतु मागील 8 वर्षांपासून मुंबईच्या नावावर एक खराब रेकॉर्ड आहे. (Mumbai Indians never Won their Opening IPL Match IPL 2021)
5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईच्या नावावर एका खराब कामगिरीची नोंद आहे. मुंबई इंडियन्सने 2013 पासून आतापर्यंत एकदाही स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकलेला नाही. आयपीएल 2013 च्या मोसमातही मुंबईला आरसीबीच्या हातून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा त्या सामन्यात रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. जसप्रीत बुमराहने याच सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. 2013 पासून आतापर्यंत आयपीएलचे 7 हंगाम संपुष्टात आले आहेत, परंतु मुंबई इंडियन्सने आजपर्यंत आयपीएलचा सलामीचा सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत आता 8 व्या हंगामात तरी हा इतिहास बदलतो की त्याची पुनरावृत्ती होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबईने सलामीची शेवटची मॅच 2012 साली जिंकली होती. त्यावेळी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला हरवून मुंबईने दिखामात सुरुवात केली होती. मुंबईने त्यावेळी चेन्नईला 8 विकेट्सने नमवलं होतं. खास गोष्ट ही आहे की मुंबईने ज्यावेळीपासून आयपीएल जिंकायला सुरुवात केली. त्यावेळीपासून मुंबई सलामीचा सामना जिंकत नाही.
गेल्या 7 वर्षांपासून आयपीएलमधील सुरुवातीचे सामने मुंबई इंडियन्सने गमावण्याची परंपरा सुरु ठेवली तर, यावेळी रोहितची चेन्नईतील अजिंक्य मोहीम संपुष्टात येऊ शकते. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार चेन्नईत कधीही विजयी झालेला नाही. विराट कोहली चेन्नईच्या खेळपट्टीवर आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.
आयपीएलची सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रेड आर्मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Banglore) यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर (MA Chidambram Stadium Chennai) खेळविण्यात येणार आहे. लागोपाठ दोन वेळा मुंबईने आयपीएलचा करंडक आपल्या नावे केलाय. आता सलामीच्या लढतीत विजयी सलामी देऊन स्पर्धेची सुरुवात थाटात करण्यास रोहितची ब्लू आर्मी सज्ज आहे. तर दुसरीकडे आक्रमक खेळाडू्ंनी भरलेला बंगळुरु संघ मुंबईला नमवून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून द्यायला तयार आहे.
(Mumbai Indians never Won their Opening IPL Match IPL 2021)
हे ही वाचा :
IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?
VIDEO : आगरी गाण्यावर रोहित शर्माचा ठेका, मुंबई पलटणचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल