मुंबई : क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. कधी बॅट्समन अगदी कमी बॉलमध्ये रेकॉर्डब्रेक इनिंग खेळतो तर कधी बोलर्स आपल्या भेदक बोलिंगने प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडं मोडतो. इकडे मुंबई महिला संघाच्या (Mumbai Womens Team) खेळाडूंनी एक अनोखी कमाल केली आहे. नागालँडच्या महिला संघाला (Nagaland women team) 50 ओव्हरच्या मॅचमध्ये 17 रन्सवर आऊट केलं. इतक्यावरच मुंबई थांबली नाही तर बॅटिंगवेळीही फक्त 4 बॉलमध्ये सामन्याचा निकाल लावला. (Mumbai Women Win one Day Match against nagaland women only 4 Ball)
सिनियर महिला वनडे ट्रॉफीमध्ये नागालँड आणि मुंबई आमने सामने होती. या मॅचमध्ये प्रथम बॅटिंगला आलेल्या नागालँडच्या महिला संघाचा मुंबईच्या रणरागिनींनी कंबरडं मोडलं. 17.4 ओव्हरमध्ये नागालँडच्या महिला संघाला ऑलआऊट केलं. नागालँडच्या पूर्ण लंघातील एकाही महिला फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. मुंबईकडून सायली सतघरेने फक्त 5 रन्स देऊन नागालँडच्या 7 बॅट्समनला तंबूत पाठवलं. 17 ओव्हरमधील 9 ओव्हर मुंबईच्या बोलर्सनी मेडन फेकले.
नागालँडने दिलेल्या 18 रन्सचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी पहिल्या 4 चेंडूत मुंबईच्या संघाला विजय मिळवून दिला. मुंबईच्या ईशा ओझाने 3 चौकारांच्या मदतीने 13 रन्स बनवले तर रुषाली भगतने एका बॉलमध्ये एक षटकार मारुन 6 रन्स केले. मुंबईने हा सामना 296 चेंडू शिल्लक ठेऊन जिंकला.
नागालँडच्या नावावर आधीही असा पराक्रम नोंद आहे. नागालँडची अंडर 19 टीम केरळविरुद्ध खेळत होती. त्या सामन्यात 17 ओव्हरमध्ये नागालँडने केवळ 2 रन्स केले होते. यातील एक रन्स वाईडचा होता. नागालँडच्या 10 बॅट्समनपैकी 9 बॅट्समनने तर खातेही उघडले नव्हते. प्रत्युतरादाखल केरळने पहिल्याच चेंडूवर सामना जिंकला होता.
(Mumbai Women Win one Day Match against nagaland women only 4 Ball)
हे ही वाचा :
अफगाणिस्तानच्या 19 वर्षीय बॅट्समनचा धमाका, 45 चेंडूत 87 धावा, केला शानदार रेकॉर्ड