पाठीमागच्या एका दशकपासून सलामीवीर मुरली विजय हा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. शिखर धवनसह मुरली विजयने काही वर्ष टीम इंडियासाठी सलामीला फलंदाजी केलीआणि संघासाठी काही उत्तम डाव आणि भागीदारी रचल्या. उजव्या हाताने फलंदाजी करणारा मुरली विजय करणारा हा केवळ एक उत्तम फलंदाजच नाही तर शिक्षणाच्या बाबतीतही त्याने स्वत: ला मागे राहू दिले नाही. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या शिक्षणाला खेळाइतकंच महत्त्व दिलं.
मुरली विजयचा जन्म 1 एप्रिल 1984 रोजी मद्रास (सध्या चेन्नई) येथे झाला. सुरुवातीच्या काळापासून तो शिक्षणात पुढे होता. क्रिकेटमधला त्याचा प्रवेश खूप उशीरा झाला. वयाच्या 17 व्या वर्षी विजयने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि पाच वर्षांनंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. तोपर्यंत अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली.
विजयने 2006 साली तामिळनाडूकडून दिल्लीविरुद्ध प्रवेश केला. पुढच्या 2 वर्षानंतर त्याने भारतीय संघात प्रवेश केला. त्याने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर टेस्टमध्ये पदार्पण केलं.
मात्र, त्यानंतरही पुढच्या दीड वर्ष संघात त्याचं स्थान पक्कं होऊ शकलं नाही. आयपीएलच्या तिसऱ्या पर्वात 2010 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने अवघ्या 56 चेंडूंत 127 धावांची खेळी केली. तेव्हापासून त्याचं संघात स्थान निश्चित झालं. त्यानंतर त्याच वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरु येथे पहिलं कसोटी शतक झळकावलं.
बंगळुरुमध्ये ठोकलेल्या शतकानंतर विजयचं भारतीय संघात स्थान पक्क झालं. तो नंतर संघाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आणि नॉटिंगहॅम ते ब्रिस्बेनपर्यंत अनेक शतकी खेळी त्याने केल्या. पुजारासमवेत चेतेश्वरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या विकेटसाठी 370 धावांची भागीदारी केली, जी या विकेटसाठी भारताचा विक्रम आहे. विजयने 2018 मध्ये भारतासाठी शेवटची कसोटी खेळली. त्याने 61 कसोटीत 3982 धावा केल्या असून त्याने 12 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 167 आहे.