IPL Auction 2021 कोहिमा : दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नच्या गोलंदाजीचे व्हिडीओ पाहून फिरकी गोलंदाजी शिकणारा नागालँडचा 16 वर्षीय लेग स्पिनर खरीवित्सो केनसे (Khrievitso Kense) यंदाच्या आयपीएल लिलावासाठी उपलब्ध आहे. यंदाच्या लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी खरीवित्सोने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. (Nagaland’s Self-Taught Sensation Leg-Spinner Khrievitso Kense Seeking IPL Riches) आयपीएलचा लिलाव आज होत आहे.
नागालँडमधील दीमापूरजवळच्या सोविमा गावातील एका सूतारकाम करणाऱ्या कारागिराची एकूण सात मुलं आहेत. खरिवित्सो केनसे हे त्याचं पाचवं आपत्य आहे. केनसे त्याच्या फिरकी गोलंदाजीबद्दल म्हणाला की, मी स्वतःच क्रिकेट शिकलो आहे, टीव्हीवर शेन वॉर्नची गोलंदाजी बघून मी फिरकी शिकलो आहे.
आयपीएल 2021 साठी 18 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. या लिलावात केनसे याची बेस प्राईस 20 लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ केनसे याला त्यांच्या संघात सहभागी करुन घेण्यासाठी इच्छूक आहेत.
पीटीआयशी बोलताना केनसे म्हणाला की, मी पूर्वी ऑफ स्पिन गोलंदाजी करायचो, परंतु त्यामुळे माझी बोटं दुखायची. त्यानंतर मी लेग स्पिन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. मला शिकवण्यासाठी कोणतेही प्रशिक्षक नव्हते. त्यानंतर मी टीव्ही आणि फोनवर शेन वॉर्नचे व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली. शेन वॉर्न ज्याप्रकारे बॉलची दिशा बदलतो, मला ते खूप आवडतं. मी लेग स्पिन गोलंदाजी स्वतःच शिकलो आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये नागालँडसाठी खेळणाऱ्या केनसे याने अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्याद्वारे सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेद्वारे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने चार सामन्यांमध्ये 7 विकेट्स मिळवल्या. मिझोरमविरुद्धच्या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी गेल्या महिन्यात केनसे याला ट्रायलसाठी बोलावलं होतं.
My best wishes to Khrievitso Kense from Nagaland, the youngest Indian player to be shortlisted for #IPL2021Auction. I hope he gets picked by a great franchisee that will perform excellently in the @IPL 2021. pic.twitter.com/Xw8M0xR81v
— Neiphiu Rio (@Neiphiu_Rio) February 13, 2021
फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या लिलावलात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) हा संघ 13 खेळाडूंना खरेदी करु शकेल. तर सनरायझर्स हैदराबाद या संघाला फक्त तीन खेळाडूंना खरेदी करता येईल. किंग्स ईलेव्हन पंजाब (KXIP) या टीमकडे सर्वाधिक 53 कोटी 10 लाख रुपयांची राशी असून ते मोठ्या ताकदीने लिलाव प्रक्रियात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर हैदराबाद संघाकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी 10 कोटी 75 लाख रुपयांचे भांडवल असेल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) जवळ एकूण 22 कोटी 70 लाख रुपये असून चेन्नई संघाला एकूण 7 खेळाडू खरेदी करता येतील. चेन्नई सुपर किंग्स या संघाने या वर्षी हरभजन सिंग आणि केदार जाधव या खेळाडूंना आपल्या संघातून वगळले आहे.
हेही वाचा
IPL 2021 auction | लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडू, जाणून घ्या 2 कोटींच्या बेस प्राईजमधील खेळाडूंची नावं
‘केरळ एक्सप्रेस’ एस श्रीसंतला मोठा झटका, आयपीएल खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार
‘रिस्क है तो इश्क है’; सलग दोन वर्ष IPL मध्ये फ्लॉप ठरलेला ‘हा’ खेळाडू चेन्नईने खरेदी केला
(Nagaland’s Self-Taught Sensation Leg-Spinner Khrievitso Kense Seeking IPL Riches)