मेलबर्न : नामिबिया (namibia) नेदरलँडची (netherlands) आज मॅच GMHBA स्टेडियमध्ये सुरु झाली आहे. नामिबियाने नेदरलँडविरुद्ध टॉस जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नामिबियाने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये विजय मिळविल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु कालच्या मॅचमध्ये सुध्दा स्कॉटलंडने ज्यावेळी वेस्ट इंडिजचा (west indies) पराभव केला. त्यावेळी सुध्दा वेस्ट इंडिजच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
विश्वचषक स्पर्धेत दोन दिवसात अतिशय रोमांचक मॅच झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळात देखील अशा मॅच पाहायल मिळण्याची शक्यता आहे. आज नामिबियाच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
नामिबियाच्या 30 धावांवर दोन विकेट पडल्या आहेत. पाच ओव्हरमध्ये दोन विकेट पडल्याने पुढे नामिबियाचे फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नेदरलँड्स टीम
विक्रमजीत सिंग, मॅक्स ऑड, बास डी लीड, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स (डब्ल्यू/सी), रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे, टिम प्रिंगल, टिम व्हॅन डर गुगेन, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन
नामिबिया टीम
मायकेल व्हॅन लिंजेन, दिवान ला कॉक, स्टीफन बार्ड, जॉन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (सी), जॉन फ्रीलिंक, डेव्हिड विसे, जेजे स्मित, झेन ग्रीन (विकेटकीपर), बर्नार्ड शॉल्ट्ज, बेन शिकोंगो