हार्दीक पांड्याने (Hardik Pandya) आशियाचषकापासून (Asia Cup 2022) पुन्हा चर्चेत आला आहे, कारण तो तुफानी फलंदाजी करीत आहे. आशिया चषकात त्याची कामगिरी पाहून अनेक माजी टीम इंडियाच्या खेळाडूंनी तो विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल असं भाकित वर्तवलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेमध्ये सुद्धा पांड्याने चांगली कामगिरी केली.
भाल्याच्या खेळात जगभर भारताचा झेंडा रोवणारा नीरज चोप्रा काल हार्दीक पांड्याच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने तिथं अधिक गरबा खेळला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यावेळी नीरज चोप्राने पदक जिंकलं होतं, त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अधिक शुभेच्छा दिल्या होत्या.
It’s past midnight at one of the most popular Garba venues in Baroda. This is the reception for @Neeraj_chopra1 as he enters.
“Garam garam seero, Neeraj bhai hero” goes the chant! pic.twitter.com/yV1MiuYz7t— Aman Shah (@aman812) September 28, 2022
नीरज चोप्राने पदक जिंकल्यापासून त्यांच्या सोशल मीडियावरती अधिक त्याचे चाहते आहेत. नीरजने एखादी गोष्ट शेअर केल्यानंतर ती तात्काळ व्हायरल होते. त्याचे गरबा खेळत असतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
ज्यावेळी तिथं नीरज चोप्रा पोहोचला त्यावेळी चाहत्यांनी मोठा उत्साह साजरा केला. त्यानंतर त्याने काही चाहत्यांची भेट घेतली. पारंपारिक वेशभुषा करुन त्याने चाहत्यांसोबत गरबा खेळला. त्याचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.