आशिया चषकात (Asia Cup 2022) अंतिम सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) श्रीलंका (Shrilanka) टीमकडून पराभव झाला. तेव्हापासून पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी टीम निवड समितीवरती जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरती सुद्धा जोरदार टीका केली. कारण चांगले खेळाडू टीम बाहेर का बसवले आहेत असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच पाकिस्तानच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इतर खेळांडूंना काही प्रश्न विचारले.
पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानची टीम जाहीर झाल्यापासून जोरदार टीका करण्यात आली आहे. कारण चांगले तंदुरुस्त खेळाडूंना डावलण्यात आल्याचं पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचं म्हणणं आहे. कमरान अकमल याने पाकिस्तानच्या टीममध्य शोएब मलिक याला संधी न दिल्याने सिलेक्शन टीमला चांगले फटकारले आहे.
मी मागच्या चार पाच वर्षापासून हे असं क्रिकेट पाहत आहे, परंतु आमच्या काळात असं क्रिकेट कधीचं पाहिलं नव्हतं. सध्या ज्या काही गोष्टी सुरु आहेत, त्या एकेदिवशी पाकिस्तान क्रिकेटचा नाश करतील एवढं मात्र नक्की असंही अकमल म्हणाला.
पाकिस्तानच्या टीममध्ये शोएब मलिकला संधी न मिळाल्याने पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी त्यांच्यावर टीका केली होती. कारण त्यांच्याकडे इतके वर्षे खेळण्याचा अनुभव असल्याचे सुद्धा माजी खेळाडूंनी सांगितले आहे.
देशभरातल्या अनेक खेळाडू्ंनी आत्तापर्यंत निवृत्ती घेतली आहे. पण ते त्यांच्या देशात क्रिकेट खेळत आहेत. महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये अजूनही खेळत आहे. ते काय वेडे आहेत का ? अजून क्रिकेट खेळत आहेत.