मागच्या महिन्यापासून एका खेळाडूवरती (Cricket Player) बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पण त्या खेळाडूने फेसबुकवरती (Facebook) मी असं कोणतंही गैरकृत्य केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. पण तरुणीची वैद्यकीय चाचणीत बलात्कार झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळे अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. या खेळाडूंने आयपीएलमध्ये (IPL) चांगली कामगिरी केली होती.
नेपाळच्या संदीप लामिचाने याच्या या अल्पवयीने तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ज्यावेळी नेपाळच्या पोलिसांनी त्या मुलीची वैद्यकीय चाचणी केली त्यावेळी बलात्कार झाल्याच निष्पन्न झालं होतं. त्यामुळे नेपाळच्या क्रिकेट बोर्डाने तात्काळ कारवाई करण्यासाठी संदीप लामिचाने याला निलंबित केलं.
संदीप कोरियामध्ये क्रिकेट खेळत असल्यामुळे तो अद्याप नेपाळमध्ये परतला नव्हता. परंतु काल जो ज्यावेळी नेपाळच्या विमानतळावर दाखल झाला. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्याची कसून चौकशी होणार असल्याचे सुद्धा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.