नेटफ्लिक्सवर 13 देशांमध्ये Amir Khan चा चित्रपट टॉप 10 मध्ये

| Updated on: Oct 14, 2022 | 12:59 PM

आत्तापर्यंत Netflix वर हा चित्रपट 6.63 दशलक्ष तास पाहिला गेला आहे.

नेटफ्लिक्सवर 13 देशांमध्ये Amir Khan चा चित्रपट टॉप 10 मध्ये
Laal Singh Chaddha
Image Credit source: twitter
Follow us on

लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) चित्रपट रिलीज व्हायच्या आगोदर त्याची खूप चर्चा झाली. चांगली आणि वाईट अशी दोन्ही पद्धतीची चर्चा सगळीकडे पाहायला मिळाली. परंतु चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) अधिक यश मिळालं नाही. ज्यावेळी या चित्रपटाची चर्चा सुरु होते, त्यावेळी अनेकांनी चांगली मते मांडली. तर अनेकांनी वाईट मते मांडली. आत्तापर्यंत अमिरच्या (Amir Khan) अनेक चित्रपटांना काही जणांनी विरोध केला आहे.

6 ऑक्टोबर 2022 रोजी Netflix वर हा चित्रपट आल्यापासून चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देशातल्या इतर चाहत्यांनी मात्र चित्रपटाचं जोरदार स्वागत केलं आहे. कारण एका आठवड्यात Netflix वर हा चित्रपट एक नंबरला आला आहे. विशेष म्हणजे भारतातील नंबर 2 नॉन इंग्लिश चित्रपट बनला आहे.

आत्तापर्यंत Netflix वर हा चित्रपट 6.63 दशलक्ष तास पाहिला गेला आहे.

हे सुद्धा वाचा

मॉरिशस, बांगलादेश, सिंगापूर, ओमान, श्रीलंका, बहरीन, मलेशिया आणि UAE या देशांमध्ये या चित्रपटाने टॉप 10 मध्ये स्थान मिळविले आहे.

दिवाळीच्या सुट्टीमध्ये Netflix वर अजून आकडा वाढण्याची शक्यता आहे.