सिडनी : विश्वचषक स्पर्धेत (T20 World cup 2022) मोठ्या मॅचेस सुरु झाल्यापासून क्रिकेटमधील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळत आहे. आजच्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या (NZ) टीमने टॉस जिंकून श्रीलंका (SL) टीम विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. श्रीलंका टीमने आशिया चषक (Asia Cup 2022)जिंकल्यामुळे श्रीलंका टीममध्ये सुद्धा गुणवंत खेळाडू आहेत.
दोन्ही टीमसाठी आजची मॅच एकदम महत्त्वपुर्ण आहे. कारण सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही टीमला आजचा सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियात पाऊस पडल्यामुळे एका ग्रुपमध्ये गुणांवरुन फार गोंधळ झाला आहे. आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये
न्यूझीलंडने 10 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंका टीमने 7 सामने जिंकले आहेत.
न्यूझीलंड टीम
फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
श्रीलंका टीम
पथुम निसानका, कुसल मेंडिस, धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कप्तान), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थीक्षाना, लाहिरु कुमारा, कसुन रजिथा