शारजा- किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू निकोलस पूरनने सीमारेषेवर भन्नाट क्षेत्ररक्षण करत 4 धावा वाचवल्या. मुरुगन आश्विनच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन याने डीप मिडविकेटला जोरदार फटका लगावला होता. निकोलस पूरनच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे षटकाराच्या जागी राजस्थानला 2 धावा मिळाल्या. संघाचा क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सने निकोलस पूरनचे कौतुक केले आहे. (nicholas pooran unbelievable fielding)
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी दरम्यान सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने डीप मिडविकेटला मारलेला फटका अडवण्यासाठी निकोलस पूरन याने सीमारेषेवरून हवेत उडी मारली. त्याच्या या प्रयत्नामुळे संजू सॅमसनला षटकाराच्या जागी अवघ्या दोन धावा मिळाल्या. मात्र, पुढील चेंडूवर संजू सॅमसनने षटकार लगावला.
सचिन तेंडुलकर याच्याकडून निकोलसचे कौतुक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निकोलस पूरनने केलेल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले आहे. आतापर्यंत पाहिलेले सर्वोत्तम क्षेत्ररक्षण आहे. निकोलसचे क्षेत्ररक्षण अतुल्य आहे, असे सचिनने म्हटले आहे. त्याने याबाबत ट्विट केले आहे.
This is the best save I have seen in my life. Simply incredible!! ?#IPL2020 #RRvKXIP pic.twitter.com/2r7cNZmUaw
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 27, 2020
राजस्थानसमोर 224 धावांचे आव्हान
पंजाबच्या संघाने 20 षटकांमध्ये 223 धावा केल्या आहेत. पंजाबच्या दोन्ही सलामीवीर फलदांजांनी राजस्थानच्या गोलदांजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. मयंक आणि राहुल यांनी 183 धावांची भागिदारी केली. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पंजाबचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 13 तर निकोलस पूरन याने 25 धावा केल्या. राजस्थानच्या संघाने 16.2 षटकांमध्ये 2 बाद 162 धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या:
IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : संजू सॅमसनचे 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण
Mayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक
(nicholas pooran unbelievable fielding)