मुंबई : भारतीय बॉक्सर निखत जरीनने (Nikhat Zareen) गुरुवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या (World Women Boxing Championship) अंतिम फेरीत थायलंडच्या (Thailand) जितपाँग जुटामासचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. निखतने 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत थायलंडच्या खेळाडूचा 5-0 असा पराभव केला. निखतने पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच, या जागतिक चॅम्पियनशिप (IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022) च्या चालू स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला बॉक्सर आहे. यासह ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन निखतचे नाव एका खास यादीत समाविष्ट झाले आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी निखत ही भारताची पाचवी महिला बॉक्सर ठरली आहे. सहा वेळा विश्वविजेत्या एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहेत ज्यांनी जागतिक विजेतेपद पटकावले आहे. आता या यादीत हैदराबादची बॉक्सर निखतचेही नाव आले आहे. दरम्यान, या विजयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौतुक केलंय.
PM Modi lauds Nikhat Zareen for ‘fantastic’ gold at World Boxing C’ships
हे सुद्धा वाचाRead @ANI Story | https://t.co/EOTIMu0aWS#NikhatZareen #Gold #WorldBoxingChampionship #PMModi pic.twitter.com/NhFeYGBpiA
— ANI Digital (@ani_digital) May 19, 2022
Our boxers have made us proud! Congratulations to @nikhat_zareen for a fantastic Gold medal win at the Women’s World Boxing Championship. I also congratulate Manisha Moun and Parveen Hooda for their Bronze medals in the same competition. pic.twitter.com/dP7p59zQoS
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2022
Congratulations to @nikhat_zareen for winning the Gold medal at the Women’s World Boxing Championships.
India is proud of your achievement. Best wishes for your future endeavours. https://t.co/nDL69tZvcK
— Amit Shah (@AmitShah) May 19, 2022
निखतने मॅचची सुरुवात सावध पवित्रा घेत केली. ती थायलंडच्या खेळाडूपासून सावध अंतर राखत होती, मात्र त्यानंतर तिने पंचेस मारण्यास सुरुवात केली आणि थायलंडच्या बॉक्सरला घाम फोडला. दरम्यान रेफ्रींनी तिला दोनदा वॉर्निंगही दिली.
निखतने येथून आक्रमक खेळाची चुणूक दाखवली. थायलंडच्या खेळाडूनेही हार न मानता चांगला बचाव करताना निखतला दूर ठेवले आणि संधी मिळताच पंचही मारले. उजव्या हाताने काही चांगले पंचेस सुरू असताना, त्याचवेळी निखतने डाव्या हाताने पंचेस मारण्याचा प्रयत्न केला. या फेरीत, निखतने आणखी 10 अचूक पंच केले आणि रेफ्रींनी तिला 10 गुण दिले तर थायलंडच्या खेळाडूला नो पॉइंट दिले गेले.
दुसऱ्या फेरीत थायलंडची बॉक्सर सुरुवातीपासूनच आक्रमक दिसली आणि तिने निखतवर जोरदार हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, निखतने संयमाचा अवलंब करत प्रतिस्पर्ध्याच्या मुसक्या आवळल्या. या फेरीतही निखतने काही अचूक पंचेस केले, जरी निखतने पहिल्या राऊंडमध्ये ज्या प्रकारचे पंच मारले होते तसा खेळ केला नाही. फेरीच्या शेवटी थायलंडच्या बॉक्सरने चांगले पंच मारून गुण मिळवले, ही फेरी तिच्या नावे झाली. मात्र तीन राऊंच्या शेवटीही निखतच आघाडीवर असल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले. समोरच्या बॉक्सरचा यावेळी नाईलाज झाला. निखतच्या या कामगिरीने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.