मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य आणि अध्यक्षपदी निवडझाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी रोहित पवार यांच्या निवडणीनंतर आनंदोस्तव साजरा केला जात आहे. विविध राजकीय नेत्यांनी रोहित पवार यांच्या निवडीवर शुभेच्छा दिल्या आहे. पण भारतीय जनता पार्टीचे आमदार निलेश राणे यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी खास ट्वीट केले आहे. यामध्ये नितेश राणे यांनी म्हंटलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया. अशा आशयाचे ट्विट केले आहे.
रोहित पवार यांचे आजोबा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहिले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवनियुक्त रोहित पवार यांच्या निवडीवर आमदार निलेश राणे यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधत रोहित पवार यांना कोपरखळी लागावली आहे.
शरद पवार यांनी क्रिकेटच्या अध्यक्षस्थानी असतांना चीयर्सलीडर्स आणल्या होत्या आता हे महाशय काय आणता म्हणून राणे यांनी केलेली टीका चर्चेचा विषय ठरत आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 9, 2023
यामध्ये रोहित पवार यांचे योगदान काय असाही सवाल निलेश राणे यांना लगावला आहे, यामध्ये ट्विटवर नेटकऱ्यांनी नितेश यांनाच सवाल केले आहे.
जशी जय शाह यांची निवड झाली आहे तशीच रोहित पवार यांची निवड झाली असल्याचे देखील म्हंटले आहे. त्यामुळे राणे यांच्या टिकेवर रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.