अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांची जोडी सर्वांनाच आवडते. विराट आपल्या पत्नीला स्पेशल फील वाटावा यासाठी नेहमी प्रयत्न करताना दिसतो. स्टेडियममध्येही विराट पत्नी अनुष्का आणि दोन मुले वामिका, अकाय यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसला आहे. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याचा विजय सोहळा साजरा करण्यासाठी टीम इंडिया मुंबईत आली होती. मुंबईत T20 विश्वचषक साजरा केल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुले वामिका, अकाय यांना भेटण्यासाठी लंडनला जाण्यास निघाला.
मुंबईत T20 विश्वचषक साजरा केल्यानंतर विराट कोहली कुटुंबाला भेटण्यासाठी निघाला. मुंबई विमानतळावर रात्री उशिरा पापाराझींनी विराटचे काही फोटो क्लिक केले. यात त्याच्या मोबाईलच्या वॉलपेपरचा फोटो क्लिक झाला. पापाराझींनी काढलेला हा फोटो खूपच प्रसिद्धीझोतात आला. विरत कोहली याच्या मोबाईलच्या वॉलपेपरमध्ये पती अनुष्का किंवा मुळे वामिका, अकाय यांचा फोटो नव्हता. तर त्यांच्या फोटोऐवजी नीम करोली बाबाचा फोटो झळकत होता.
विरत कोहली याच्या मोबाईलचा वॉलपेपरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका युजरने ट्विटवर “बाबा नीम करोली म्हणजे रियलमध्ये विराट कोहलीसाठी खूप काही आहे.” असे म्हटले आहे. तर, दुसऱ्या यूजरने “विराट कोहलीच्या फोनवर नीम करोली बाबा वॉलपेपर आहे… जय महाराज जी.” असे लिहिले आहे. तिसऱ्या युजरची कमेंट मजेशीर आहे. ‘विराट कोहली याने त्याच्या फोनवर बाबा नीम करोली वॉलपेपर बसवला आहे. तो त्यांचा खरोखरच भक्त आहे. तो धार्मिक आहे म्हणूनच तो खूप चांगले काम करत आहे असे म्हटले आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही नीम करोली बाबा यांचे भक्त आहेत. हे जोडपे अनेकदा वेगवेगळ्या शहरांतील त्यांच्या आश्रमांना भेट देताना दिसतात. नीम करोली बाबा हे विसाव्या शतकातील महान संत म्हणून मानले जातात. उत्तर प्रदेशमधील अकबरपूर जिल्हा फिरोजाबाद हे त्यांचे जन्मस्थान आहे. भुवलीपासून 7 किमी अंतरावर भुवलीगडाच्या डाव्या बाजूला कैंची, नैनिताल हे ठिकाण आहे. कैंची मंदिरात दरवर्षी 15 जून रोजी वार्षिक उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी येथे बाबांच्या भक्तांची मोठी गर्दी असते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाले. त्यांचे लग्न अतिशय थाटामाटात पार पडले. त्यांना वामिका आणि अके नावाची दोन मुले आहेत.