Wimbledon 2022: जेकोविचने २१ वे ग्रँड स्लॅम जिंकले, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसचा केला पराभव, आता नदालसोबत ग्रँड स्लॅमची स्पर्धा

| Updated on: Jul 10, 2022 | 10:50 PM

लंडन : सर्बियाचा टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचने (Serbian tennis star Novak Djokovic) रविवारी ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा 4-6, 6-3, 6-7, 7-6 असा पराभव करत सातव्या वेळी त्याने विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे (Men’s singles Wimbledon) विजेतेपद पटकावले आहे. पहिला सेट 4-6 अशा फरकाने गमावल्यानंतर 35 वर्षीय जोकोविचने शानदार पुनरागमन करत सलग तीन सेट जिंकून विजेतेपद पटकावले. 2022 मधील […]

Wimbledon 2022: जेकोविचने २१ वे ग्रँड स्लॅम जिंकले, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसचा केला पराभव, आता नदालसोबत ग्रँड स्लॅमची स्पर्धा
Follow us on

लंडन : सर्बियाचा टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचने (Serbian tennis star Novak Djokovic) रविवारी ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा 4-6, 6-3, 6-7, 7-6 असा पराभव करत सातव्या वेळी त्याने विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे (Men’s singles Wimbledon) विजेतेपद पटकावले आहे. पहिला सेट 4-6 अशा फरकाने गमावल्यानंतर 35 वर्षीय जोकोविचने शानदार पुनरागमन करत सलग तीन सेट जिंकून विजेतेपद पटकावले. 2022 मधील जोकोविचचे हे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद आहे, ज्याने 2021 मध्ये तीन विजेतेपदे जिंकली आहेत.

 

सलग चौथ्यांदा विम्बल्डन

जोकोविचचे पहिले नाही, दुसरे नाही तर हे सलग चौथे विम्बल्डन विजेतेपद आहे. 2018 सालापासून तो सातत्याने विम्बल्डनचे विजेतेपद पटकावत आहे. या विजेतेपदासह जोकोविचच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या आता पर्यंत 21 झाली आहे.

राफेल नदालनंतर दुसऱ्या स्थानावर

या विजेतेपदामुळे आणि सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत तो राफेल नदालनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत रॉजर फेडरर आता 20 विजेतेपदांसह तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

पीट सॅम्प्रास बरोबर

नोव्हाक जोकोविचने सातव्या विम्बल्डन विजेतेपदासाठी अमेरिकेचा माजी दिग्गज खेळाडू पीट सॅम्प्रासची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता प्रत्येकी सात जेतेपदे आहेत.

रॉजर फेडररने 8 वेळा विम्बल्डन

रॉजर फेडररने 8 वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविच आता त्याच्या एका विजेतेपदाच्या मागे राहिला आहे.