Video : युवराज सिंगने पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, गोलंदाजांची उडाली तारांबळ

| Updated on: Sep 23, 2022 | 10:12 AM

अनेक दिवसांनी कालच्या सामन्यात युवराज सिंगचं चाहत्यांना अनोखं दर्शन पाहायला मिळालं.

Video : युवराज सिंगने पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, गोलंदाजांची उडाली तारांबळ
yuvraj singh
Image Credit source: twitter
Follow us on

भारताचा माजी महान क्रिकेटपटू युवराज सिंगची (Yuvraj Singh) एक अनोखी ओळख आहे. त्यांच्या खेळीची आजही चाहते आठवण काढतात. मागच्या दोन दिवसांपुर्वी त्याने सहा चेंडूत सहा षटकार मारले होते, त्याला 15 वर्षे पुर्ण झाली. युवराज सिंग सद्या टीम इंडियाच्या (Team India) लीजेंडमधून खेळत आहे, तिथंही त्याने त्याचा जलवा दाखवला आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाले आहेत.

सामना सुरु असताना अचानक पाऊस आल्याने ती इंग्लंड लीजेंड विरुद्धची मॅच 15 ओव्हरची खेळवण्यात आली. विशेष म्हणजे काल सचिन तेंडूलकरची सुद्धा अप्रतिम खेळी झाली आहे. तेंडूलकरने 20 बॉलमध्‍ये 40 धावा काढल्‍या आहेत.

मधल्या फळीत फलंदाजीस आलेल्या युवराज सिंगने काल 15 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली. त्यामध्ये त्याने गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली. 3 षटकार उत्तुंग खेचले, तसेच 2 चौकार सुद्धा मारले.

अनेक दिवसांनी कालच्या सामन्यात युवराज सिंगचं चाहत्यांना अनोखं दर्शन पाहायला मिळालं. त्यामुळे चाहते देखील खुश झाले आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करीत युवराजला शुभेच्छा दिल्या आहेत.

2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने तुफानी खेळी केली होती. त्याचा आता पंधरा वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध युवराज सिंगची मोठी खेळी झाली नव्हती. परंतु कालच्या तुफान खेळीमुळे सगळ्यांना पुन्हा टी-20 वर्ल्ड कपची आठवण झाली.