लंडन : बॅडमिंटन कोर्टवर आपल्या अप्रतिम खेळाने दिग्गजांना भुरळ पाडणाऱ्या भारताच्या युवा शटलर लक्ष्य सेनचं (Lakshya Sen) मोठं स्वप्न भंगलं आणि तो इतिहास रचण्यात अपयशी ठरला. लक्ष्य सेनने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या (All England Championship Final 2022) अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली. जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचला, पण विजेतेपदापासून केवळ एक पाऊल मागे राहिला. रविवारी, 20 मार्च रोजी बर्मिंघम एरिना येथे खेळवण्यात आलेल्या ऑल इंग्लंड पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारतीय स्टारला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या दिग्गज खेळाडू व्हिक्टर एक्सेलसेनने (Viktor Axelsen Beats Lakshya Sen) लक्ष्य सेनचा 21-10, 21-15 असा पराभव केला. भारतीय स्टारने आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी जिंकू दिले नाही, त्याने व्हिक्टरला कडवी झुंज दिली. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय बॅटमिंटनपटूचं विजेतेपद पाहण्याची प्रतीक्षा 21 वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकली नाही.
21-10, 21-15 या स्कोअरलाइनसह, व्हिक्टर एक्सेलसेनने हे विजेतेपद जिंकले आणि तो दुसऱ्यांदा या स्पर्धेचा चॅम्पियन बनला. लक्ष्यने आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आणि बलवान प्रतिस्पर्ध्याला सहज जिंकू दिले नाही. हा सामना बराच वेळ चालला. पहिल्या गेममध्ये 62 शॉट्सची रॅली होती, जी एक्सेलसेनने जिंकली, तर दुसऱ्या गेममध्ये लक्ष्य जेव्हा पराभवाच्या जवळ होता, तेव्हा 70 शॉट्सची सर्वात लांब रॅली घेण्यात आली आणि ती लक्ष्यने जिंकली.
गेल्या आठवड्यात टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन ऍक्सेलसेनला जर्मन ओपनमध्ये पराभूत करुन सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या लक्ष्य सेनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. कारण त्याने बर्मिंगहॅममध्ये अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासादरम्यान अनेक मोठ्या खेळाडूंना पराभूत केल्यामुळे पुन्हा एकदा चांगले परिणाम अपेक्षित होते. लक्ष्यनेही तेच केले, पण अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, कारण लक्ष्यची सर्वोत्तम कामगिरी असूनही एक्सेलसेनने त्याच्यापेक्षा अधिक पॉईंट्सची कमाई केली होती. मात्र, लक्ष्यने एकही पॉईंट सहजासहजी दिला नाही आणि प्रत्येक गुणासाठी ऍक्सेलसेनला घामा गाळायला लावला.
Here’s @lakshya_sen with this @YonexAllEngland runner-up memorabilia to start your week! ??#MondayMotivation#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/B5QfZNCXyc
— BAI Media (@BAI_Media) March 21, 2022
पहिल्या गेमचा निकाल पूर्णपणे एकतर्फी लागला. एक्सलसनने सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली होती. पहिल्या गेममध्ये 6-0 ने पिछाडीवर असलेल्या लक्ष्यने सलग दोन गुण मिळवून पुनरागमनाच्या आशा उंचावल्या. त्यानंतर सुरुवातीलाच पुनरागमन करत पुन्हा 5 गुण घेत 11-2 अशी आघाडी घेतली. यादरम्यान 62 शॉट्सची रॅली पाहायला मिळाली.
यादरम्यान, उंच उंची असलेल्या व्हिक्टर एक्सेलसेनने क्रॉस कोर्ट शॉट्स, पॉवरफुल स्मॅश आणि चतुर ड्रॉप शॉट्ससह लक्ष्यची परीक्षा घेतली आणि भारतीय स्टारने आपल्या भक्कम बचावाने प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.
यानंतर गेम जिंकेपर्यंत निकराची लढाई पाहायला मिळाली. ज्यामध्ये एक्सेलसेनने 10 गुण जिंकले, तर लक्ष्यने 8 गुण मिळवले आणि स्कोअर 21-10 असा झाला.
Lion hearted display by #LakshyaSen today in the #AllEnglandOpen. Lakshya may have lost but has won the hearts of billions of Indians. This is the start ! I can see him contributing to India’s gold reserves in the future. pic.twitter.com/yncDaiAwxG
— Harsh Goenka (@hvgoenka) March 20, 2022
दुसर्या गेममध्ये स्पर्धा अधिक चुरशीची झाली. यामध्ये सुरुवातीला ४-४ अशा बरोबरीनंतर एक्सेलसेनने वेग वाढवत ११-५ असा ब्रेक घेतला. ब्रेकनंतरही सामना चुरशीचा झाला आणि दोघांमध्ये प्रत्येकी एका गुणासाठी संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळाली.
लक्ष्य सेन 10-17 असा पिछाडीवर होता, तेव्हा सामना पूर्णपणे लक्ष्यच्या हातून निसटला आहे असे वाटत असतानाही त्याचा उत्साह कायम होता. या स्कोअरलाइनवर असताना दोन खेळाडूंमधील सामन्यातील सर्वात लांब रॅली पाहिली, ज्यामध्ये 70 शॉट्स झाले आणि शेवटी एक्सेलसेनने एक पॉईंट मिळवत सामन्यात पुनरागमन केलं.
प्रत्येक रॅलीत एक्सेलसेनने जोरदार हल्ला केला, त्याचवेळी लक्ष्यने कोर्टवर अनेकवेळा डायव्हिंग करत आपला बचाव कायम ठेवला. अखेर 53 मिनिटांच्या गेमनंतर व्हिक्टर ऍक्सेलसेनने विजेतेपद पटकावले.
लक्ष्य सेनचा जन्म 16 ऑगस्ट 2001 रोजी अल्मोडा येथे झाला. बॅडमिंटन हा खेळ लक्ष्यला वारशाने मिळाला आहे. अल्मोडा येथे त्याचे आजोबा त्यांच्या बॅडमिंटन खेळामुळे खूप प्रसिद्ध होते. त्याच वेळी, त्याचे वडील डीके सेन हेदेखील प्रसिद्ध बॅटमिंटनपटू होते. डीके सेन हे लक्ष्यचे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. लक्ष्यचा मोठा भाऊ चिराग हादेखील त्याच्या बॅटमिंटन खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. लक्ष्य अवघ्या नऊ वर्षांचा असताना तो पहिल्यांदा वडिलांसोबत त्याच्या भावाची सब-ज्युनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. तिथेच त्याने बॅडमिंटनपटू होण्याचा निर्धार केला.
Heartiest congratulations @lakshya_sen ??
Brilliant run at #AllEngland2022 ?
Wish you the best for future ?#KheloIndia #Badminton https://t.co/mg4ySza31j
— Khelo India (@kheloindia) March 21, 2022
इतर बातम्या