लखनौ : हालाकीच्या परिस्थितीवर, शारिरीक व्यंगावर, असाध्य रोगावर मात करुन आपलं ध्येय गाठणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहिल्या आहेत. या व्यक्ती अनेकांना आपल्या कृतीतून जगाला मार्गदर्शन करत असतात. गेल्या दोन वर्षांत कोरोना या साथरोगाने अनेक कुटुंबं उध्वस्त केली. अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा मोडला. परंतु यावरही काहींनी मात केली. उत्तर प्रदेशमधल्या मेरठचा युवा तिरंदाज नीरज चौहानचं (Neeraj Chauhan) कुटुंब कोरोना काळात रस्त्यावर आलं. मात्र त्या परिस्थितीवर मात करत नीरजने आपलं कुटुंब तर साभाळलंच, सोबत त्याने आपल्या ध्येयाच्या दिशेने सुरु असलेला प्रवास न थांबवता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची पात्रता फेरी पूर्ण केली आहे. नीरज आता आता आशियाई क्रीडा स्पर्धेत (2022 Asian Games) भारताचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. नीरज चौहानची आशियाई स्पर्धा, तिरंदाजी विश्वचषक (Archery World Cup) आणि जागतिक खेळांमध्ये निवड झाली आहे.
नीरज रविवारी हरियाणाच्या सोनीपत येथे 24 ते 30 मार्च दरम्यान सुरू असलेल्या तिरंदाजीच्या चाचणीत पात्र ठरला. चाचण्यांमध्ये दुसरे स्थान पटकावून नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. मूळचे गोरखपूरचे असलेले नीरज चौहानचे वडील अक्षयलाल हे मेरठमधील कैलाश प्रकाश स्टेडियममध्ये स्वयंपाकी (Cook) आहेत. या स्टेडियममध्ये नीरजने तिरंदाजीचा सराव सुरू ठेवला. पण, कोरोनाच्या काळात वडिलांची नोकरी गेली आणि जगणे कठीण झाले. अशा परिस्थितीतही नीरज मागे हटला नाही. त्याने कोरोना काळात मिळेल ती कामं करुन कुटुंबाच्या पालनपोषणासाठी वडील आणि भावासोबत मेहनत केली. या काळात त्याने त्याच्या तिरंदाजीवरील लक्ष विचलित होऊ दिलं नाही.
नीरजचा मोठा भाऊ सुनील चौहान बॉक्सर आहे. दोन्ही भावांनी मिळून कोरोनाच्या काळात भाजीपाल्याची गाडी लावून कुटुंब चालवले. त्यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर माजी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही खेळाडूंना आर्थिक मदत केली होती. त्यानंतर नीरजची स्पोर्ट्स कोट्यातून ITBP मध्ये निवड झाली. आता पुन्हा एकदा मुलगा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार हा नीरज आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. नीरजचे वडील अक्षयलाल देखील मुलाच्या या यशावर खूप आनंदी आहेत.
A year after getting financial help from the Sports Ministry, UP Archer Neeraj Chauhan makes it to India’s Asian Games team
Details: https://t.co/dEV2luCst1@IndiaSports @PIB_India @MIB_India pic.twitter.com/RVd2Vu4mTC
— PIB In Meghalaya (@PIBShillong) March 28, 2022
आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा नोव्हेंबरमध्ये जकार्ता येथे होणार आहेत. नीरज त्यात सहभागी होणार आहे. त्याचवेळी, एप्रिलमध्ये तुर्कीतील अँटालिया येथे विश्वचषक आणि जागतिक क्रीडा स्पर्धा यूएसए येथे होणार आहेत. या तिन्ही स्पर्धांमध्ये नीरज भारताचं तिरंदाजीत प्रतिनिधीत्व करणार आहे.
Neeraj will be making his mark on a global level by representing India at the World Cup and World Games this year!
(2/2)https://t.co/1gFsEfxHLm@ianuragthakur @YASMinistry @pibyas @PIB_India @PIB_MoTA pic.twitter.com/8IUpxhke5e
— Ministry of Tribal Affairs, Govt. of India (@TribalAffairsIn) March 28, 2022
इतर बातम्या