भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने असले की त्याला युद्धाचं स्वरूप प्राप्त होतं. खासकरून दोन्ही बाजूचे चाहते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु असून भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारताने सलग चार सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. पहिल्या सामन्यात चीनला 3-0 ने पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात जापानला 5.1 ने, तिसऱ्या सामन्यात मलेशियाला 8-1 ने आणि चौथ्या सामन्यात दक्षिण कोरियाला 3-1 ने मात दिली. आता पाचव्या सामन्यात समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ आहे. दरम्यान, पाकिस्तानने उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. चार पैकी 2 सामन्यात विजय मिळवला असून स्थान पक्कं झालं आहे. रॉबिन राउंड फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची लढत होत आहे.
रॉबिन राउंड स्पर्धेत भारताने हा सामना जिंकला तर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम राहील. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर राहील. त्यामुळे या सामन्यानंतर लगेचच उपांत्य फेरीची लढत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना एकदा नाही तर दोनदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो.
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. चीनच्या हुलुनबुइर या मैदानात हे दोन्ही संघ भिडणार आहेत. सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी हा सामना सुरु होईल. या सामन्याचं थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन 1 आणि टेन 1 एचडी चॅनेलवर पाहता येईल. तसेच मोबाईलवर हा सामना सोनीलिव एप आणि वेबसाईटवर हा सामना लाईव्ह पाहता येईल.
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघ : कृष्ण बहादुर पाठक (गोलकीपर), सूरज करकेरा (गोलकीपर, जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह (कर्णधार), जुगराज सिंह, संजय, सुमित, राज कुमार पाल, नीलकंठ शर्मा, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंह, मोहम्मद राहील मौसीन, अभिषेक, सुखजीत सिंह, अरजीत सिंह हुंदल, उत्तम सिंह, गुरजोत सिंह.