मुंबई : फुटबॉलमध्ये गेल्या काही दिवसात भारताने बऱ्यापैकी प्रगती केली आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींची संख्याही वाढली आहे. असं असताना एएफसी एशियन कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली. पहिल्या सत्रात जोरदार चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे पहिला हाफ 0-0 ने बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसऱ्या सत्रात गुरप्रीत सिंग संधूची चूक भारताला चांगलीच महागात पडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात आघाडी घेण्यात यश मिळालं. दुसऱ्या हाफमध्ये पास रोखण्याच्या प्रयत्नात, गुरप्रीतने नकळतपणे जॅक्सन इर्विनकडे चेंडू पास केला. त्याने त्या संधीचं सोनं केलं आणि पेनल्टी क्षेत्रातून गोल पोस्टवर चेंडूवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे पहिला गोल करण्यात यश आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला आक्रमक पवित्रा सुरुच ठेवला.
ऑस्ट्रेलियाने पहिला गोल मारल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर आली. 73 व्या मिनिटाला दुसरा गोल करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. पेनल्टी एरियामध्ये रिले मॅकग्रीचा शानदार पास आणि जॉर्डन बॉसला पहिल्या फटका मारण्यात यश मिळालं. त्याने सहजरित्या त्याचं गोलमध्ये रुपांतर केलं. त्यामुळे 2-0 ने आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने विजयाची वाट धरली. दुसरीकडे, टीम इंडियाला कमबॅक करणं कठीण गेलं. दुसरीकडे, पूर्वार्धात भारताचा कर्णधार सुनील छेत्री गोल करण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या हेडरने गोल मारण्याचा प्रयत्न केला. पण लक्ष्य थोड्या फरकाने चुकले.
टीम इंडियाला आता स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी साखळी फेरीतील उर्वरित दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे. 18 जानेवारीला उजबेकिस्तानशी आणि 23 जानेवारील सिरियाशी सामना होणार आहे. त्यानंतर 21 मार्चपासून पुन्हा एकदा टीम इंडिया वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने खेळणार आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन: गुरप्रीत सिंग संधू(गोलकीपर), राहुल भेके, सुभाषीष बोस, संदेश झिंगन, सुरेश सिंह वांगजम, मनवीर सिंह, सुनील छेत्री (कर्णधार), लल्लियाझुआला छांगटे, ललेंगमविया रालटे, निखिल पूजारी, दीपक टांगरी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: मॅटी रायन(कर्णधार) (विकेटकीपर), केय रोलेस, मार्टिन बॉयल, कोन्नोर मेटकाफ, मिच ड्यूक, एझिज बेहिच, किनू बॅकस, हॅरी सौत्तर, जॅकसन इर्विन, क्रेग गुडविन, गेथिन जोन्स.