चीन | एशियन गेम्स 2023 मध्ये फुटबॉल टीम इंडियाने ‘करो या मरो’ अशा सामन्यात बांगलादेशवर मात केली आहे. टीम इंडियाने यासह विजयाचं खातं उघडलं आहे. टीम इंडिया बांगलादेशवर 1-0 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवलाय. टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्री याने अखेरच्या क्षणी केलेला गोल हा निर्णायक ठरला. चीन विरुद्ध फुटबॉल टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे बांगलादेश विरुद्धचा सामना हा टीम इंडियासाठी अटीतटीचा होता. या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाला अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र सुनील छेत्रीने संधी साधत मॅचविनिंग गोल केलाच.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हा सामना अतिशय अटीतटीचा झाला. सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल हा 85 व्या मिनिटाला करण्यात आला. त्याआधी टीम इंडिया आणि बांगलादेश टीमच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र दोन्ही संघांना काही गोल करण्यात यश आलं नाही. पहिल्या हाफपर्यंत कुणालाच गोल करता आला नाही.
त्यामुळे सामन्याचा निकाल हा पेनल्टी शूटआऊटद्वारे लागला. कॅप्टन सुनील छेत्री याने पेन्लटी शूटआऊटद्वारे गोल करण्याची संधी वाया घालवली नाही. सुनीलने गोल करत टीम इंडियाने खातं उघडलं. या एकमेव गोलच्या जोरावरच टीम इंडियाने विजयी झेंडा रोवला.
सुनील छेत्री मॅचविनर
𝐖𝐡𝐨 𝐞𝐥𝐬𝐞 𝐛𝐮𝐭 𝐡𝐢𝐦? ⭐
Sunil Chhetri saves #TeamIndia from the brink of elimination as his winning penalty kept our #AsianGames2022 Men’s #Football hopes alive 🙌#Cheer4India #HangzhouAsianGames #INDBAN #SonyLIV pic.twitter.com/kEPUrwgqEF
— Sony LIV (@SonyLIV) September 21, 2023
फुटबॉल टीम इंडियाला एशियन गेम्समधील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. चीनने 5-1 अशा फरकाने टीम इंडियावर विजय मिळवला होता. त्यामुळे बांगलादेशवर विरुद्धचा सामना हा प्रतिष्ठेचा आणि निर्णायक असा होता. अशा परिस्थितीत सुनील छेत्री हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
दरम्यान आता फुटबॉल टीम इंडिया आपला पुढील सामना हा 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात म्यानमारचं आव्हान असणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया मोठ्या फरकाने विजय मिळवण्याच्या मानसाने मैदानात उतरेल. त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असेल.