Avani Lekhara : व्हिसा मिळण्यासाठी भटकत होती, त्याच स्पर्धेत मोडला जागतिक विक्रम, अवनीच्या जिद्दीचं पंतप्रधानांकडूनही कौतुक

| Updated on: Jun 09, 2022 | 9:04 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अवनीच्या कामगिरीचं कौतुक केलंय. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून अवनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Avani Lekhara : व्हिसा मिळण्यासाठी भटकत होती, त्याच स्पर्धेत मोडला जागतिक विक्रम, अवनीच्या जिद्दीचं पंतप्रधानांकडूनही कौतुक
अवनी लेखारा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन अवनी लेखारा (Avani Lekhara) हिनं मंगळवारी पॅरा-शूटिंग विश्वचषक-2022 (para shooting world cup 2022) महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत 250.6 गुणांच्या जागतिक विक्रमासह सुवर्णपदक (Gold Medal) जिंकलं आहे. 20 वर्षीय अवनीने 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिक गेम्ससाठी देखील फ्रान्समधील चाटेरो येथे 249.6 चा स्वतःचा विश्वविक्रम मोडून विजय मिळवलाय. पोलंडच्या एमिलिया बाबास्कानं 247.6 गुणांसह रौप्यपदक जिंकलं तर 225.6 गुणांसह कांस्यपदक स्वीडनच्या नॉर्मनला मिळालं आहे. अवनी यापूर्वी टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर होती. कारण, तिच्या प्रशिक्षक आणि सहाय्यकाला सुरुवातीला व्हिसा देण्यात आला नव्हता. मात्र, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि क्रीडा मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटलं. आज अवनीनं त्याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे.

हे सुद्धा वाचा

अवनीनं ट्विट केलंय की,  ‘चाटियारो 2022 च्या R2 10m एअर रायफल SH1 स्पर्धेत जागतिक विक्रमी वेळेसह सुवर्णपदक मिळविल्याचा आणि भारताचा पहिला पॅरिस 2024 कोट्याचा अभिमान आहे. पॅरालिम्पिकनंतरची माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार.’

अवनीचं ट्विट पाहा

शूटिंग पॅरा स्पोर्ट्सनं ट्विट केलंय की, ‘अवनी लेखरा, R2 महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 मध्ये नवीन विश्वविक्रम केला आहे. भारतीय नेमबाजानं 2022 च्या चटियारो विश्वचषकात 250.6 गुणांसह मागील विक्रम (249.6) मोडला आहे.’

शूटिंग पॅरा स्पोर्ट्सचं ट्विट पाहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अवनीच्या कामगिरीचं कौतुक केलंय. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून अवनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

ठरली पहिला भारतीय महिला

अवनीनं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एसएच1 प्रकारात 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तिनं महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आणि पॅरालिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.