मुंबई : एक मोठी बातमी हाती आलीय. अखेर टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची (Roger Federer Retirement) घोषणा केली आहे. त्याने पहिल्यांदा पीट सॅम्प्रासचा 14 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला. सेरेना विल्यम्सच्या (Serena williams) निवृत्तीच्या (Retirement) घोषणेतून टेनिस चाहत्यांना पूर्णपणे सावरता आलेलं नाही. त्यातच आता त्यांना ही फेडररची निवृत्तीची घोषणा समोर आली आहे. पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे.
To my tennis family and beyond,
With Love,
Roger pic.twitter.com/1UISwK1NIN— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
फेडररने जाहीर केले की पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल आणि त्यानंतर तो कोणत्याही ग्रँड स्लॅम किंवा टूर स्पर्धेत भाग घेणार नाही. लेव्हर कप पुढील आठवड्यात लंडनमध्ये 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
फेडररने आपल्या चाहत्यांना एक व्हिडिओ आणि चार पानी भावनिक निवेदनाद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. सतत दुखापत, तंदुरुस्ती आणि वय हे आपल्या निर्णयामागचं कारण म्हणून त्याने सांगितले, ‘मी 41 वर्षांचा आहे. 24 वर्षांच्या कारकिर्दीत मी 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला नेहमीच माझ्या अपेक्षा आणि अपेक्षांपेक्षा जास्त प्रेम केले आहे आणि आता मला हे मान्य केले पाहिजे की माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपवण्याची वेळ आली आहे, असं त्यांनं म्हटलंय.
अलीकडेच क्रीडाविश्वातून निवृत्तीच्या बातम्या वाढत असल्याचं दिसतंय.