Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडू दारू प्यायले तर चालतं का? जाणून घ्या नियम

| Updated on: Jul 26, 2024 | 5:49 PM

ऑलिम्पिक स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 200हून अधिक देशांनी स्पर्धेत भाग नोंदवला आहे. जगभरातील 10,500 खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहे. असं असताना जापानच्या एका खेळाडूला स्पर्धेपूर्वी काढता पाय घ्यावा लागला. ध्रुमपान केल्यानं जापान प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता धूम्रपान आणि दारूबाबत काय निर्णय आहे याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडू दारू प्यायले तर चालतं का? जाणून घ्या नियम
Image Credit source: (Photo: Getty Images)
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची जय्यत तयारी झाली आहे. या स्पर्धेसाठी 10500 स्पर्धक भाग घेणार आहेत. तसेच लाखो प्रेक्षक या सोहळ्याचे साक्षीदार ठरणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा 1896 पासून सुरु झाली असून यंदाचं 33वं पर्व आहे. दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केले जाते. या स्पर्धेसाठी 200 हून अधिक देशांनी सहभाग नोंदवला आहे. असं असताना एका बातमीने क्रीडारसिकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. जापानची 19 वर्षीय जिम्नॅस्टिक मियाताला स्पर्धेपूर्वी बाहेर पडावं लागलं. तिने धूम्रपान करून संघाच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जिम्नॅस्टिकमध्ये पाच ऐवजी चार खेळाडू भाग घेणार आहे. आता क्रीडारसिकांना प्रश्न पडला आहे की, धूम्रपान आणि दारू पिणं इतकं महागात पडू शकतं.ऑलिम्पिक स्पर्धेत यासाठी काय नियम आहेत याबाबत शोधाशोध सुरु झाली आहे. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडूंना अनेक नियमांचं पालन करावं लागतं. यात ध्रुमपान आणि दारूसंदर्भातला नियम आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत स्पर्धकांना दारू आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. जर एखादा स्पर्धक असं करताना आढलाल तर त्याला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला जातो. या व्यतिरिक्त एखाद्या देशाचा खेळाडू सरावादरम्यान दारू किंवा धूम्रपान करताना आढळला आणि ठोस पुरावा असेल तर त्याला खेळाडूला बाहेर केलं जातं. या नियमामुळेच जापानची 19 वर्षीय जिम्नॅस्टिक मियाताला नाव मागे घ्यावं लागलं. तिने धूम्रपान करून संघाच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं. तसेच मायदेशी परतल्यानंतर चौकशीला सामोरं जाताना दारु प्यायल्याची कबुली दिली आहे.

भारताच्या ताफ्यात एकूण किती खेळाडू?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांमधील 329 इव्हेंट्स होणार आहेत. भारताच्या ताफ्यात एकूण 117 खेळाडू आहेत. विविध खेळांमध्ये हे खेळाडू भाग घेणार आहेत. या स्पर्धकांपैकी 72 खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहेत. 26 जुलैला स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर भारतीय हॉकी संघ आपला पहिला सामना 27 जुलैला खेळणार आहे. भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता हा सामना होणार आहे. भारतीय पुरुष संघाचं कर्णधारपद हरमनप्रीत सिंहकडे आहे.