पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होऊन आता आठवडा उलटला आहे. भारताच्या पारड्यात आतापर्यंत तीन मेडल पडले आहेत. अधिक पदकं मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे, या ऑलिम्पिक स्पर्धेत काही कारणावरून वादाला फोडणी देखील मिळाली आहे. तर काही ठिकाणी आनंदाचे क्षण अनुभवता आले आहेत. चीनच्या ऑलिम्पिक स्पर्धेकासाठी ही स्पर्धा काही कारणानी स्मरणीय ठरली. कारण स्पर्धेत गोल्ड पदक मिळवण्यासोबत प्रिय व्यक्तीने लग्नासाठी मागणीही घातली गेली आहे. चीनची बॅडमिंटनपटू हुआंग या कियोंग पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील हा क्षण कधीही विसरू शकत नाही. 2 ऑगस्टला तिने आपला साथीदार झेंग सिवेईसोबत मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक मिळवलं. चीनच्या या जोडीने दक्षिण कोरियाच्या किम वोन हो आणि जियोंग ना युन या जोडीला पराभूत केलं. या सामन्यात चीनच्या जोडीचं वर्चस्व पाहायला मिळालं. 41 मिनिटात दक्षिण कोरियन जोडीला 21-8, 21-11 ने पराभूत केलं.
मिश्र दुहेरीत विजय मिळवताच पदक सोहळा पार पडला. यात हुआंग या कियोंगने गोल्ड पदक मिळवलं. या क्षणाची प्रत्येक स्पर्धक आतुरतेने वाट पाहात असतो, तो क्षण ती अनुभवत होती.हा क्षण तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणापैकी एक होता. असं असताना कियोंगच्या आनंदात आणखी भर पडली. कारण तिचा प्रियकर लियू युचेनने भर मैदानात लग्नासाठी मागणी घातली. हे सर्व पाहून उपस्थित प्रेक्षकही आवाक् झाले. कियोंगने त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत होकार दिला. प्रियकर लियू युचेनने गुडघ्यावर बसून प्रेम व्यक्त केलं आणि हुआंग या कियोंगला अंगठी घातली. तिचा प्रियकर लियू युचेन हा देखील बॅडमिंटनपटू असून चीनसाठी खेळतो.
“I’ll love you forever! Will you marry me?”
“Yes! I do!”OMG!!! Romance at the Olympics!!!❤️❤️❤️
Huang Yaqiong just had her “dream come true”, winning a badminton mixed doubles gold medal🥇with her teammate Zheng Siwei
Then her boyfriend Liu Yuchen proposed! 🎉🎉🎉 pic.twitter.com/JxMIipF7ij
— Li Zexin (@XH_Lee23) August 2, 2024
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत यापूर्वीही असं चित्र पाहायला मिळालं आहे. ओपनिंग सेरेमनीवेळी अर्जेंटिनाच्या एका खेळाडूने आपल्या जोडीदाराला सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. अर्जेंटिनाच्या मेन्स हँडबॉल टीमचा प्लेयर पाबलो सिमोनेटने महिला हॉकी संघाची खेळाडू मारिया कँपॉयला प्रपोज केलं होतं. दोघंही एकमेकांना 2015 पाहून ओळखतात. Olympic Games ने आपल्या एक्स हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता.