नवी दिल्ली : 28 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या ठिकाणी 72 देशांतील जवळपास चार हजार 500 खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातून देखील जवळपास 230 खेळाडूंचा सहभाग असलेला चमू बर्मिंगहॅमला जाणार आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेला अवघे काही दिवस उरलेले असतानाच भारतासाठी पदकाच्या प्रबळ दावेदार गणल्या जाणाऱ्या दोन महिला अॅथलिट्स उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. या प्रकाराने भारतीय चमूला मोठा झटका बसला आहे. मात्र, त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. पदकांच्या प्रबळ दावेदार असलेल्या धावपटू एस. धनलक्ष्मी (S Dhanalakshmi) आणि तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असलेली ऐश्वर्या बाबू (Aishwarya Babu) या महिला खेळाडू उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत (डोप टेस्ट) दोषी आढळळ्या आहेत. जागतिक अॅथलेटिक्सच्या अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने घेतलेल्या चाचणीत स्टेरॉइड्स सेवन केल्याचे निदर्शनास आले आहेत.
एस धनलक्ष्मी शंभर मीटर आणि चार बाय शंभर मीटरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होती. युजीने येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी देखील ती भारतीय संघातही होती. पण व्हिसाच्या समस्यमुळे ती जाऊ शकली नव्हती. धनलक्ष्मी 26 जून रोजी कोसानोव्ह मेमोरियल अॅथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी ऐश्वर्या बाबूचे नमुने घेतले होते. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ऐश्वर्यानं चेन्नईमधील स्पर्धेत तिहेरी उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला होता. कोणत्याही भारतीय खेळाडूची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने 6.83 मीटर लांब उडी मारली होती.
28 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या ठिकाणी 72 देशांतील जवळपास चार हजार 500 खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातून देखील जवळपास 230 खेळाडूंचा सहभाग असलेला चमू बर्मिंगहॅमला जाणार आहे.
चाचणीत (डोप टेस्ट) दोषी आढळळ्या आहेत. जागतिक अॅथलेटिक्सच्या अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने घेतलेल्या चाचणीत स्टेरॉइड्स सेवन केल्याचे निदर्शनास आले आहेत.