पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव! पदक विजेत्या खेळाडूला झाली लागण

| Updated on: Jul 30, 2024 | 4:22 PM

दोन वर्षांपूर्वी कोरोनारुपी राक्षसाची संपूर्ण जगाने धास्ती घेतली होती. लॉकडाऊन आणि वैद्यकीय सुविधांची उणीण पाहता धडकी भरल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे कोरोनाचं नाव जरी काढलं तरी धडध़ड व्हायला लागते. असं असताना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पॅरिसमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव! पदक विजेत्या खेळाडूला झाली लागण
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जगभरातील 200 हून अधिक देश सहभागी झाले आहेत. तसेच दहा हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंचा पदकांसाठी कसही लागताना दिसत आहे. असं असताना खेळाच्या महाकुंभात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  कारण पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ नये याची धास्ती वाटत आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा जलतरणपटू एडम पॅटी याला कोरोनाची लागण झाली आहे. एडम पॅटीने पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक इव्हेंटमध्ये रजत पदक जिंकलं होतं. पदक जिंकल्याच्या एक दिवसानंतर त्याची तब्येत खालावली. गळ्यात खाज येत असल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात एडम पॅटी पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं.

29 वर्षीय एडम पॅटीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक मिळवून इतिहासाची नोंद केली आहे. सलग तीन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा एकमेव जलतरणपटू ठरला आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कोरोना प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता. मात्र फ्रान्समध्ये याबाबत काहीच नियोजन केलं गेलेलं नाही. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह एडम पॅटी शुक्रवारपर्यंत बरा होण्याची शक्यता आहे. जर बरा झाला तर इंग्लंडसाठी आणखी काही स्पर्धेत भाग घेऊ शकतो. एडम पॅटी खेळणार की नाही याचा निर्णय प्रशिक्षक घेणार आहेत.

दरम्यान, भारताकडून 117 खेळाडूंचा चमू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गेला आहे. आतापर्यंत मनु भाकर आणि सरबजोत सिंह वगळता एकही पदक मिळवता आलेलं नाही. मनु भाकरने वैयक्तिक आणि मिक्स्ड स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. आता 3 ऑगस्टला 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेवर तिचं लक्ष असणार आहे. या स्पर्धेत तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.