मुंबई | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या आर प्रज्ञानंद याचं चेस वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा चेज वर्ल्ड कपचा विजेता ठरला आहे. टायब्रेकच्या पहिल्या गेममध्ये प्रज्ञानानंद याला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे प्रज्ञानानंद याला कमबॅक करणं अवघड झालं. कार्लसन याने पुढील गेममध्ये याने ड्रॉ केला आणि सामना जिंकला. आर प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात झालेल्या क्लासिकल प्रकारातील दोन्ही सामने हे ड्रॉ राहिले. त्यामुळे या सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये पोहचला. या टायब्रेकरमध्ये मॅग्नस कार्लसन याने प्रज्ञानानंद याच्यावर मात करत चेज वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.
मॅग्नस कार्लसन चेज वर्ल्ड चॅम्पियन
International Chess Federation (FIDE) tweets, “Praggnanandhaa is the runner-up of the 2023 FIDE World Cup! Congratulations to the 18-year-old Indian prodigy on an impressive tournament! On his way to the final, Praggnanandhaa beat, among others, world #2 Hikaru Nakamura and #3… pic.twitter.com/g9Ky5VUdA4
— ANI (@ANI) August 24, 2023
चेस वर्ल्ड कप 2023 मधील दुसऱ्या टायब्रेकर सामन्यात प्रज्ञानानंद मागे पडला. यानंतर कार्लसन याचा स्कोअर 1.5 इतका झाला. तर प्रज्ञानंदा याचा 0.5 असा स्कोअर होता. या सामन्यात 18 चाळीनंतर क्विन्स बदलली, मात्र याचा फायदा हा कार्लसन याला झाला.
टायब्रेकर सामन्यात दोन्ही खेळाडूंना 25-25 मिनिटांचा अवधी मिळतो. तसेच प्रत्येक चाळीनंतर खेळाडूच्या वेळेत 10 सेकंदांची वाढ होते. या वर्ल्ड कपमधील पहिल्या 2 अंतिम सामने खेळवण्यात आले. पहिला सामना हा 22 ऑगस्टला पार पडला. या पहिल्या सामन्यात प्रज्ञानानंद हा सफेद मोहऱ्यांसोबत खेळला. तर कार्लसन काळ्या मोहऱ्यांसोबत खेळला. त्यानंतर 35 चाळींनंतर दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन केलं आणि सामना अनिर्णित राहिला.
तर दुसरा क्लासिकल सामना हा 23 ऑगस्टला पार पडला. या सामन्यात कार्लसन सफेद तर प्रज्ञानानंद काळ्या मोहऱ्यांसह खेळला. या सामन्यात दोघांनीही घिसाडघाई केली नाही आणि सामना ड्रॉ झाला. या सामन्यात 30 चाळी झाल्या. त्यानंतर दोघांनी हात मिळवला. प्रज्ञानानंद याचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, मात्र त्यानेही कीर्तीमान केला. प्रज्ञानानंद याने चेस वर्ल्ड कप फायनल खेळणारा तिसरा युवा खेळाडू असा बहुमान मिळवला.