ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त जगभरातील खेळाडूंचा कुंभमेळा पॅरिसमध्ये भरला आहे. 26 जुलैपासून या स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 200हून अधिक देशांनी भाग घेतला आहे. तर रशिया आणि बेलारूस या देशांना या स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. ऑलिम्पिक इतिहासात भारताने आतापर्यंत 35 पदकांची कमाई केली आहे. यात 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदकांची कमाई केली. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आशा वाढल्या आहेत. 100 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशातून 117 खेळाडूंचा चमू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे. भारतीय चमूत सर्वाधिक खेळाडू हे हरयाणा आणि पंजाबमधील आहेत. या दोन राज्यांतून एकूण 42 स्पर्धकांची वेगवेगळ्या खेळांसाठी निवड झाली आहे.
हरयाणातून 24, तर पंजाबमधून 18 खेळाडूंची निवड झाली आहे. उत्तराखंडमधून 4, उत्तर प्रदेशमधून 8, राजस्थानमधून 2, मध्य प्रदेशमधून 3, बिहारमधून 1, पश्चिम बंगालमधून 3, सिक्किममधून 1, आसामधून 1, मणिपूरमधून 2, झारखंडमधून 1, ओडिशामधून 2, गुजरातमधून 2, महाराष्ट्रातून 5, तेलंगाणातून 4, आंध्र प्रदेशमधून 4, कर्नाटकमधून 7, तामिळनाडूतून 13 आणि केरळमधून 5 जण आहेत. महाराष्ट्रातून प्रवीण जाधव, अविनाश साबळे, सर्वेश कुशारे, चिराग शेट्टी आणि स्वप्निल कुसले यांचा समावेश आहे. तिरंदाजीत प्रवीण जाधव, शूटिंगमध्ये स्वप्नील कुसले, एथलॅटिक्समध्ये अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे, तर बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टीची निवड झाली आहे.
25 जुलै 2024 :
27 जुलै 2024 :
28 जुलै 2024 :
29 जुलै 2024 :
30 जुलै 2024 :
31 जुलै 2024 :
5 ऑगस्ट 2024 :
7 ऑगस्ट 2024 :