Video : ऑलिम्पिकमध्ये प्रायव्हेट पार्टमुळे गमवावं लागलं पदक, आता मिळाली दोन कोटींची ऑफर; पाहा काय झालं ते

| Updated on: Aug 06, 2024 | 8:47 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रोज काही ना काही घडत आहे. कधी खेळगावातील सुविधा, तर कधी सीन नदीचं खराब पाणी..पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची या ना त्या कारणाने चर्चा होत आहे. अशीच एक चर्चा फ्रान्सच्या ॲथलीटची रंगली आहे. त्याने पदक जिंकलं नाही पण 2 कोटी रुपयांची ऑफर मात्र मिळाली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण ते

Video : ऑलिम्पिकमध्ये प्रायव्हेट पार्टमुळे गमवावं लागलं पदक, आता मिळाली दोन कोटींची ऑफर; पाहा काय झालं ते
Image Credit source: Instagram
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पोल वॉल्ट प्रकारात भाग घेण्याऱ्या फ्रान्सच्या ॲथलीट अँथनी एमिराटीची चर्चा रंगली आहे. त्याला कारणंही तसंच आहे. अँथनीने घेतलेली उडी प्रायव्हेट पार्टमुळे फसली आणि क्रॉस बार पडला. अँथनी फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी 5.70 मीटर उंच उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. सर्वकाही व्यवस्थितपणे पार पडत असताना शेवटच्या क्षणाला क्रॉस बारला प्रायव्हेट पार्ट लागला आणि पदरी निराशा पडली. त्यामुळे अँथनीला यादीत 12व्या स्थानावर राहावं लागलं. यामुळे अँथनी एमिराटी फारच निराश झाला होता. कारण फायनलमध्ये स्थान मिळवणाऱ्या दावेदारांपैकी एक होता. त्याने 2022 अंडर 20 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये संधी हुकल्याने अँथनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट निराशा दिसत होती. मात्र असं असलं तरी अँथनीला 2 कोटी रुपयांची ऑफर मिळाली. ज्या कारणासाठी पदक हुकलं तेच कारण ऑफरसाठी पुढे आलं आहे.

अमेरिकन मिडिया कंपनी टीएमजीनुसार, एका वेबसाईटकडून फ्रान्सच्या ॲथलीटला 60 मिनिटांच्या वेब कॅम शोसाठी ही ऑफर देण्यात आली आहे. एका वेबसाईटने पुरुषत्व दाखवण्यासाठी अँथनी एमिराटीला अडीच लाख युएस डॉलर म्हणजे दोन कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. या संदर्भात वेबसाईच्या उपाध्यक्षांनी अधिकृतरित्या स्टेटमेंटही जाहीर केलं आहे. या 60 मिनिटांच्या शोमध्ये त्याला कॅमेऱ्यासमोर प्रायव्हेट पार्ट दाखवावा लागणार आहे. दरम्यान ही ऑफर अँथनी स्वीकारतो की नाही ते अद्याप स्पष्ट नाही. पण या बातमीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, पदकाची संधी हुकल्यानंतर अँथनी एमिराटीने आपलं म्हणणं मांडलं. अँथनीने फक्त क्रॉसबार पार न केल्याप्रकरणी भाष्य केलं. इतर कोणत्याही विषयावर भाष्य करणं टाळलं. कारण अंतिम फेरीत न पोहोचल्याने आधीच निराश झाला होता. भले ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळालं नाही, पण विचित्र घटनेमुळे सध्या त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.