नवी दिल्ली : अरे काय हा बाबर आझम (Babar Azam), असं नेटिझन्स आता म्हणून लागले आहेत. त्याचं कारणंही तसंच आहे. पाकिस्तानचा (Pakistan Cricket Team) कर्णधार असलेल्या बाबर आझमचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो रॉजर फेडररला (Roger Federer) ओळखू शकत नाही. हे म्हणजे खूप धक्कादायक आहे. एका देशाच्या क्रिकेट टीमचा कर्णधार दिग्गज खेळाडूला कसा विसरू शकतो, असा आता प्रश्न विचारल्या जातोय. नेटिझन्स देखील चांगलेच खवळले आहेत. यावेळी बाबर आझम चांगलाच ट्रोल झाला. टीका होत असताना त्यानं केलेली गंभीर चूक देखील दुर्लक्ष करता येण्यासारखी नाही, असंही नेटिझन्स म्हणू लागले आहेत.
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररनं लेव्हर कपमध्ये आपल्या कारकिर्दीतील अंतिम सामना खेळला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. गेल्या आठवड्यात स्वित्झर्लंडच्या 20 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन असलेला फेडररनं आपला शेवटचा सामना 23 सप्टेंबरला प्रदीर्घ प्रतिस्पर्धी राफेल नदालसोबत खेळला.
निवृत्तीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर सर्वांनी फेडररला निरोप दिला आणि आपले विचार व्यक्त केले. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे. पण, याचवेळी बाबर आझमनं माती खाल्ली. त्यानं असं काही केलं की यामुळे नेटिझन्सचा संताप झाला.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) September 26, 2022
बाबरनं लिहिलंय की, महान व्यक्तिमत्व. आयकॉनिक. निवृत्तीच्या शुभेच्छा. तू खरोखरच महान आहेस. यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर बाबर चांगलाच ट्रोल झाला. त्याची खिल्ली उडवली गेली. तो दिग्गज खेळाडूला कसं विसरू शकतो, असंही बोललं गेलं.
पाकिस्तानच्या कर्णधार बाबर आझमचा एक जुना व्हिडिओ शेअर होऊ लागलाय. यामध्ये तो रॉजर फेडररला ओळखू शकला नाही. फेडररचे नाव घेण्यासाठी तो बराच काळ धडपडत असल्याचंही तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.
चॅट शोमध्ये बाबर आझम फेडररला ओळखू शकला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाव सांगता येत नसताना हसायचे. चाहत्यांसाठी हे आणखी आश्चर्यचकित करणारे होते. हा व्हिडिओ शेअर करत लोक बाबर आझमची खिल्ली उडवताना दिसले.