ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कसं आहे भारताचं वेळापत्रक, जाणून घ्या

| Updated on: Jul 28, 2024 | 12:30 AM

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा पहिला दिवस काही खास राहिला नाही. दिवसाच्या शेवटी काही चांगल्या बातम्या कानावर पडल्या. यात मनु भाकरची अंतिम फेरीत धडक आणि हॉकीत भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. आता दुसऱ्या दिवशी भारतीय चमूचं कसं असेल वेळापत्रक ते जाणून घेऊयात

ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कसं आहे भारताचं वेळापत्रक, जाणून घ्या
Manu Bhaker
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा 117 खेळाडूंचा चमू पोहोचला आहे. मात्र स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताची झोळी रितीच राहिली. पहिल्या दिवशी एक तरी पदक मिळेल अशी क्रीडाप्रेमींना आशा होती. मात्र तसं काही झालं नाही. आता दुसऱ्या दिवशी स्पर्धेचं वेळापत्रक कसं असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय खेळाडू दुसऱ्या दिवशी बॅडमिंटन, नेमबाजी, नौकायन, टेबल टेनिस, स्विमिंग आणि तिरंदाजीत भाग घेतील. यात शूटिंगमध्ये पदकाची अपेक्षा आहे. मनु भाकर ही सुवर्ण पदकासाठी 10 मीटर पिस्टलच्या अंतिम फेरीत उतरणार आहे. सुरुवात नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल पात्रतेसाठी दुपारी 12.45 मिनिटांनी इलोवेनिल वलारिवन उतरेल. तर पुरुष पात्रतेसाठी संदीप सिंग आणि अर्जुन बाबूता दुपारी 2.45 वाजता उतरतील. पण सर्वांच्या नजरा या मनु भाकरवर असतील. दुपारी साडे तीन वाजता 10 मीटर एअर पिस्टलचा अंतिम सामना आहे. यात भारताला सुवर्ण पदकाची आस आहे.

दरम्यान बॅडमिंटन स्पर्धेला होईल महिला एकेरीत पीव्ही सिंधु विरुद्ध एफए अब्दुल रज्जाक (मालदीव) यांच्यात सामना होईल. हा सामना दुपारी 12.50 मिनिटांनी असेल. त्यानंतर पुरुष एकेरीत एचएस प्रणय विरुद्ध फॅबियन रोथ (जर्मनी) यांच्यात सामना होईल. हा सामना रात्री 8 वाजता असेल. दुसरीकडे, पुरुष एकल स्कल नौकायन प्रकारात बलराज पवार दुपारी 1 वाजून 18 मिनिटांनी स्पर्धा करेल. जलतरण स्पर्धेत पुरुष 100 मीटर स्पर्धेत श्रीहरी नटराज उतरणार आहे. ही स्पर्धा दुपारी 3.16 मिनिटांनी आहे. तर महिला 200 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत धनिधी देसिंगू उतरणार आहे. या स्पर्धेची वेळ दुपारी साडे तीनची आहे.

तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी भारताकडून अंकिता भक्त, भजन कौर आमि दीपिका कुमारी उतरणार आहे. यांच्यासमोर फ्रान्सचे स्पर्धक असतील. हा सामना संध्याकाळी 5.45 ला असणार आहे. महिला उपांत्य फेरी 7 वाजून 17 मिनिटांनी असेल. पदक टप्प्यातील सामने रात्री 8 वाजून 18 मिनिटांनी होतील. टेबल टेनिस एकेरीच्या दुसऱ्या टप्प्यात श्रीजा अकुला विरुद्ध क्रिस्टिना कालबर्ग (स्वीडन) यांच्यात दुपारी 12.45 मिनिटांनी लढत होईल. त्याच वेळेस मनिका बत्रा आणि अन्ना हर्से (ग्रेट ब्रिटेन) यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता पुरुष एकेरीत शरथ कमल आणि डेनी कोजुल (स्लोवेनिया) यांच्यात सामना होईल.