मुंबई | आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने सलग 7 सामने जिंकून सेमी फायनलमध्ये रुबाबदार एन्ट्री केली. आता टीम इंडिया रविवारी 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध आपला आठवा सामना खेळणार आहे. टीम इंडिया पॉइंट्स टेबलमधील अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. या दरम्यान हॉकी वूमन्स टीम इंडियाने उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरुन आली आहे. वूमन्स हॉकी टीमन इंडियाने एशियन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
वूमन्स टीम इंडियाने दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात रौप्य पदक विजेत्या दक्षिण कोरियावर एकतर्फी विजय मिळवलाय. टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. टीम इंडियाने यासह फायनलचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने अंतिम राउंड रॉबिन सामन्यात दक्षिण कोरियाला 5-0 ने पराभूत केलं होतं. दरम्यान या सेमी फायनल सामन्यात सलीमा टेटे हीने 11 व्या मिनिटाला गोल केला. तर दुसरा गोल महाराष्ट्राची कन्या वैष्णवी फाळके हीने 19 व्या मिनिटाला केला.
दरम्यान टीम इंडियाने या विजयासह रौप्य पदक निश्चित केलंय. मात्र टीम इंडियाचं लक्ष हे सुवर्ण पदकाकडे आहे. टीम इंडियाचा सुवर्ण पदकासाठी सामना हा जपान विरुद्ध होणार आहे. हा सामना रविवारी 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जपानने पहिल्या सेमी फायनल सामन्यात चीनला पराभूत केलं. जपानने चीनला 2-1 अशा फराने नेस्तानाबूत केलं. त्यामुळे आता रविवारी टीम इंडिया विरुद्ध जपान यांच्यात महामुकाबला होणार आहे. टीम इंडियाच्या रणरागिणींकडे तमाम हॉकी चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची सुपर कामगिरी
𝐈𝐍𝐃𝐈𝐀 𝐈𝐍𝐓𝐎 𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐒!
Khelte hum ekdum powerful hai, aur ab jeet ek kadam dur hai.#HockeyIndia #IndiaKaGame #JWACT2023 pic.twitter.com/J8ltho0pP5
— Hockey India (@TheHockeyIndia) November 4, 2023
दरम्यान या विजयानंतर टीम इंडियाचं सोशल मीडियावर कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे. हॉकी टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच महाअंतिम सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या जात आहे. त्यामुळे तमाम भारतीयंना टीम इंडियाच्या महिलांकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा लागून राहिली आहे.