टीम इंडियाला मोठा झटका, दुखापतीमुळे हार्दिक थेट वर्ल्ड कपमधून बाहेर

| Updated on: Jan 22, 2023 | 12:00 AM

टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा स्टार खेळाडू वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

टीम इंडियाला मोठा झटका, दुखापतीमुळे हार्दिक थेट वर्ल्ड कपमधून बाहेर
Follow us on

मुंबई : टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉकी टीम इंडियाचा सामना रविवारी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा मिडफिल्डर हार्दिक सिंह अजूनही दुखापतीतून सावरला नाही. त्यामुळे शनिवारी एफआयएच हॉकी वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. हार्दिकला इंग्लंड विरुद्धच्या 15 जानेवारीला टीम इंडियाच्या दूसऱ्या पूल सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे हार्दिकला वेल्स विरुद्ध तिसऱ्या सामन्यात खेळता आलं नव्हतं.

टीम इंडियाला मोठा झटका

हार्दिक बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाने रविवारी क्रॉसओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं तर क्वार्टरृ फायनलमध्ये बेल्जिम विरुद्ध सामना होईल. हार्दिकच्या जागी राजकुमार पालला टीममध्ये घेण्यात आलंय.

हार्दिक एफआईएच वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. हा निर्णय हार्दिकला वेल्स विरुद्ध विश्रांती दिल्यानंतर आणि त्यानंतर दुखापत पाहिल्यानंतर घेण्यात आल्याचं हॉकी इंडियाने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

कोच काय म्हणाले?

“आम्हाला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तसेच आगामी सामन्यांसाठी हार्दिकच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्याचा अवघड निर्णय घ्यावा लागला. आम्हाला हार्दिकची दुखापत सुरुवातीला इतकी गंभीर वाटली नाही. मात्र आज त्याला मैदानात पाहिल्यानंतर समजलं की हार्दिकला आणखी वेळ लागेल. हार्दिकच्या जागी राजकुमार पाल याला घेण्याचा निर्णय झाला आहे”,अशी माहिती कोच ग्राहम रीडने यांनी दिली.

हार्दिकची भावूक पोस्ट

“दुर्देवाने दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं माझं स्वप्न भंगलं. वर्ल्ड कपमध्ये कधी अशा प्रकारे माझी मैदान सोडण्याची इच्छा नव्हती. प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं, असं म्हणतात. माझ्यासोबत असं का झालं, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. यात नक्कीच काही वेळ जाईल. मी विश्वास खरा ठरवू शकलो नाही, हे फार निराशाजनक आहे. तसेच मी योगदान देऊ शकलो नाही. मात्र आमच्यासाठी स्पर्धा संपलेली नाही. खरंतर वर्ल्ड कपला आता सुरुवात झाली आहे”, अशी भावूक पोस्ट हार्दिकने केली आहे.