खो खो वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ब्राझीलला लोळवलं. भारताने पहिल्या डावापासून ब्राझीलला बॅकफूटवर ढकललं होतं. जबरदस्त डिफेंसमुळे भारताला पहिल्या डावात 16 गुणांवर रोखण्यात यश आलं होतं. पहिल्या डावात ब्राझीलने अटॅक केला आणि भारत डिफेंसिव्ह भूमिकेत होता. भारताच्या पाच बॅच बाद करण्यात ब्राझीलला यश आलं. तर सहाव्या बॅचमधील एका खेळाडूला बाद केलं. भारताने पहिल्याच डावात डिफेंस करताना दोन गुण मिळवले. त्यामुळे भारताची पकड घट्ट झाली होती. दुसऱ्या डावात भारताने अटॅक करताना 34 गुणांची कमाई केली. तसेच एकही डिफेंस गुण ब्राझीलला दिला आहे. तिसऱ्या डावात भारताने पुन्हा एकडा ब्राझीलला झुंजवलं. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. भारताने फक्त 18 गुण दिले. तर डिफेंसच्या माध्यमातून 2 गुण मिळवले होते. त्यामुळे तिसऱ्या डावातील फरक विजयासाठी पक्का होता. त्यामुळे चौथ्या डावात ब्राझील तगडा डिफेंस करणं भाग होतं. पण ते काही शक्य नाही हे आधीच कळलं होतं. तरी भारतीने चौथ्या डावात एकही डिफेंस गुण न देता अटॅक करताना 26 गुण मिळवले. यासह चार डावात भारताने 64 गुणांची कमाई केली. तर ब्राझीलला फक्त 34 गुण मिळवता आले. भारताने हा सामना 30 गुणांनी जिंकला.
भारताने नेपाळनंतर ब्राझीलला पराभवाची धूळ चारली असून स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे. ब्राझील विरूद्धच्या सामन्यात अटॅक करताना पबनी सबरने जबरदस्त कामगिरी केली होती. यासाठी त्याला बेस्ट अटॅककर म्हणून गौरविण्यात आलं. तर ब्राझीलच्या एम व्ही कॉस्टाला जबरदस्त डिफेंड केलं म्हणून गौरविण्यात आलं. तर भारताचा कर्णधार प्रतीक वायकर या सामन्यासाठी सामनावीर ठरला. भारताचा पुढचा सामना पेरूशी होणार आहे. हा सामना बुधवारी रात्री 8 वाजता होणार आहे.
भारतीय पुरुष संघ: प्रतिक वाईकर (कर्णधार), प्रबाणी सबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिव पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग