चक दे इंडिया! खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत इराणला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक

| Updated on: Jan 15, 2025 | 8:27 PM

खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या वुमन्स गटात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. दक्षिण कोरियाला पहिल्या सामन्यात 175-18 या फरकाने पराभूत केलं होतं.आता दुसऱ्या सामन्यात इराणला 100-16 या फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

चक दे इंडिया! खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत इराणला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक
Image Credit source: Twitter
Follow us on

खो खो वर्ल्डकप स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारतीय मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. भारतातील प्रत्येकाच्या मनातील खेळ म्हणून खो खो या खेळाकडे पाहिलं जातं. त्यात वर्ल्डकप म्हंटलं तर सांगायलाच नको.. भारतीय महिला खो खो संघाने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली केली. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा दारूण पराभव केला होता. दक्षिण कोरियाला भारताने 175-18 या फरकाने पराभूत केलं होतं. आता दुसऱ्या सामन्यात भारताने हीच कामगिरी कायम ठेवली आहे. भारताने इराणचा 100-16 या फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावापासून मजबूत पकड मिळवली होती. भारताने अटॅक करताना इराणला बॅकफूटवर ढकललं होतं. पहिल्या डावात भारताने 50 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर डिफेंस करताना भारताने दोन ड्रीम प्वॉइंट मिळवले होते. भारताने या डावात फक्त 10 गुण गमावले. म्हणजेच इराणला दुसऱ्या डावात अटॅक करताना फक्त 10 गुण मिळाले. त्यातही भारताने दोन गुण चांगला डिफेंस करताना कमावले.

तिसरा डाव खूपच महत्वाचा होता. या डावात इराणला कमबॅक करण्याची काय संधी होती. पण तसं झालं नाही. भारताने तिसऱ्या डावात 41 गुण मिळवले. तर डिफेंसमध्ये एकही गुण इराणला दिला नाही. आधी 42 गुणांची आघाडी आणि त्यात 41 गुण मिळवत 83 धावांची आघाडी होती. त्यामुळे चौथ्या डावात ही आघाडी मोडून काढणं काही सोपं नव्हतं. भारताने डिफेंस करताना चौथ्या डावात 7 गुण मिळवले. तर इराणला अटॅक करूनही फक्त 6 गुण मिळवता आले. म्हणजेच भारताने चौथ्या डावात इराणच्या अटॅकला चांगलंच झुंजवलं. या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने भारतीय कर्णधार प्रियंका इंगलेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारतीय महिला संघ:प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू, मोनिका, नाझिया बीबी