क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. एका फुटबॉल सामन्यादरम्यान अचानक वीज पडल्याने एका खेळाडूचा मृ्त्यू झाल्याचं वृत्तसमोर आलं आहे. तर मॅच रेफरी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या मॅच रेफरीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मॅच रेफरीवर उपचार सुरु आहेत. ही घटना पेरु येथे घडली आहे. पेरु येथील चिलका येथे 3 नोव्हेंबरला या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जुवटेड बेलाविस्टा विरुद्ध फॅमिलाय चोका यांच्यात हा सामना खेळवण्यात येत होता. या सामन्यादरम्यान ही घटना घडली.
पहिल्या हाफचा थरार सुरु होता. साऱ्यांचं लक्ष सामन्याकडे होतं. जुवटेड बेलाविस्टा सामन्यात 2-0 ने आघाडीवर होती.या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. एकाएकी हवामान बदललं. त्यामुळे मॅच रेफरीने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. तसेच खेळाडूंना मैदानाबाहेर जाण्याची सूचना केली. मॅच रेफरीने दिलेल्या सूचनेनुसार, खेळाडू मैदानाबाहेर जात होते. तेव्हा वीज कोसळली. जोस होगो डे ला क्रूज मेजा या 39 वर्षीय खेळाडूवर वीज पडली. यातच त्याचा मृत्यू झाला. वीज कोसळल्याने मॅच रेफरीसह 5 खेळाडूही मैदानात पडले.
यात 40 वर्षीय गोलकीपर हुआन चोका गंभीररित्या जखमी आहेत. त्यांच्या शरीराचा काही भाग जळाला आहे. या गोलकीपरसह इतर खेळाडूंवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
फुटबॉल सामन्यात वीज कोसळली, एक खेळाडू ठार
In Peru, a soccer player died after being struck by lightning during a match
The tragedy occurred on November 3 during a match between clubs Juventud Bellavista and Familia Chocca, held in the Peruvian city of Huancayo.
During the game, a heavy downpour began and the referee… pic.twitter.com/yOqMUmkxaJ
— NEXTA (@nexta_tv) November 4, 2024
दरम्यान वीज कोसळून फुटबॉलरचा मृत्यू होण्याची ही काही पहिली वेळ नाही. अवघ्या काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये इंडोनेशिया येथील वेस्ट जावा येथील सिलिवांगी स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा वीज कोसळून 35 वर्षीय सेप्टन राहराजा यांचा मृत्यू झाला होता.