भारतीय महिला नेमबाज मनु भाकरने दोन पदकं जिंकत 124 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. स्वतंत्र भारतात दोन पदकं जिंकणारी स्पर्धक ठरली आहे. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत तिने दोन पदकं जिंकली आहेत. मनु भाकरने 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि मिक्स्ड प्रकारात पदकाची कमाई केली आहे. दोन्ही ठिकाणी मनुच्या खात्यात कांस्य पदक पडले आहेत. आता मनु या स्पर्धेत पदकांची हॅटट्रीक करण्यासाठी उतरणार आहे. तिसरं पदक जिंकण्यात यश आलं तर अशी भारतीय ऑलिम्पिक इतिहासात महारेकॉर्ड होईल. हा विक्रम मोडीत काढणं कोणत्याही खेळाडूला शक्य होणं कठीण आहे. भारतीय ऑलिम्पिक इतिहासात 1900 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून नॉर्मन प्रिचर्डने दोन रजत पदक जिंकले होते. त्यानंतर मनु भाकरने दोन पदकं जिंकत पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.आता 124 वर्षांचा हा विक्रम मोडीत काढण्याची संधी मनु भाकरकडे आहे. 3 ऑगस्टला मनु भाकर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तेव्हा तिच्याकडून आणखी एका पदकाची अपेक्षा आहे.
मनु भाकर 3 ऑगस्टला 25 मीटर पिस्टल स्पर्धेत भाग घेऊ शकते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरची ही शेवटची स्पर्धा असणार आहे. दोन कांस्य पदक मिळवल्यानंतर मनुची नजर आता सुवर्ण पदकावर असणार आहे. दोन पदकं मिळवल्यानंतर मनुचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. त्यामुळे तिच्याकडून क्रीडाप्रेमींना आणी एका पदकाची अपेक्षा आहे. मनु भाकरने 25 मीटर पिस्टल प्रकारात पदक जिंकलं तर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन पदकं जिंकणारी पहिली स्पर्धक ठरेल.
मनु भाकरला दुसरं कांस्य पदक जिंकल्यानंतर हॅटट्रीकबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तिने सांगितलं की, ‘पदक जिंकण्यासाठी सर्वस्वी पणाला लावणार आहे. तसेच हॅटट्रीक करण्याचा प्रयत्न करेन.’ दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अंतिम फेरी गाठू शकली नव्हती. पण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकून मनुने कसर भरून काढली आहे. आता आणखी एका पदकाची क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे. ऑलिम्पिक इतिहासात भारताच्या खात्यात आता 37 पदकं झाली आहेत.