पॅरिस ऑलिम्पिक म्हटलं की आता मनु भाकरचं नाव घेतलं जाणार आहे. वयाच्या अवघ्या 22 वर्षी पोरीने इतिहास रचला आहे. मनु भाकरने भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकले असून अशी कामगिरी ती पहिली खेळाडू ठरली आहे. एकाच खेळाडूने दोन ऑलिम्पिक जिंकलेत यामध्ये पी.व्ही. सिंधू आणि सुशील कुमार यांचा समावेश आहे. पण मनुने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवलेत. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र आणि 10 मीटर एअर पिस्तूल महिला यामध्ये मनुने कौतुकास्द कामगिरी करत कांस्यदकाटी कमाई केली आहे. मनु भाकरचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. मात्र यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याआधीचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता.
मनु भाकरचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 मध्ये हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील जाट कुटुंबात झाला होता. मनुचे वडील राम किशन मर्चंट नेव्हीमध्ये तर आई सुमेधा भाकर शाळेमध्ये मुख्याध्यपिका होत्या. मनुने डॉक्टर बनावं अशी तिच्या आईची इच्छा होती. मात्र शाळेतील पीटी टीचरने त्यांना सांगितलं की मुनला स्पोर्ट्समझध्ये टाका. डॉक्टरांना फक्त गाव आणि जवळेच लोक ओळखतात पण एखाद्या खेळाडूला संपूर्ण देश ओळखतो. मनुचे वडील राम किशन यांचं तिला बॉक्सर बनवण्याचं स्वप्न होतं. मनुचा मोठा भाऊ अखिल भाकरही बॉक्सिंग करत होता. भावाचं पाहत तिनेही बॉक्सर होण्याचं ठरवलं आणि तयारी सुरू केली. बॉक्सिंगमध्येही तिने चांगली कामगिरी केली मनु नॅशनल लेव्हलपर्यंत खेळली आणि मेडलही जिंकले. मात्र सरावावेळी मनुच्या डोळ्याला जखम झाली आणि तिला बॉक्सिंग सोडावी लागली.
मनुने त्यानंतर मार्शल आर्टसची ट्रेनिंग घेऊ लागली. मात्र तिने काही दिवसातच हा खेळ सोडण्यचं ठरवलं पण या खेळामध्ये चीटिंग होते असं तिचं म्हणणं होतं. मुनने स्केटिंग, टेनिस आर्चरीमध्ये तिने भाग घेतला मात्र तिचं मन लागत नव्हतं. मनु तिच्या आईच्या शाळेत शुटींग रेजमध्ये एक शॉट मारला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पीटी टीचर अनिल जाखड यांनी तिच्यातील क्षमता ओळखली होती. मनुच्या पालकांना त्यांनी सांगिकतलं की तुम्ही मुलीला स्पोर्टसाठी वेळ द्या, ही देशासाठी नक्की पदक आणेल. अनिल जखड यांचं हे वाक्य खरं ठरलं आणि मनुनेही आज इहिास रचलाय.
गोल्ड कोस्ट 2018 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनु भाकर कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन आहे. ब्युनोस आयर्स 2018 मधील युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर सांघिक पिस्तूलचे विजेतेपद पटकावले होते. ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी मनु भाकर सर्वात तरूण भारतीय खेळाडू आहे. 2023 च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनु पाचव्या स्थानावर होती. त्यामुळे भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये कोठा मिळवला होता.
2018 नॅशनल शुटींग चॅम्पियनशीपमध्ये 10 मीटर वर्ल्ड नंबर एक असलेल्या हिना सिंधूला हरवलं होतं. या कामगिरीच्या आधारावर टोकियो ऑलिम्पिकमध्ये निवड झाली होती. मात्र पिस्तुलमध्ये बिघाड झाल्यान ती 2021 मध्ये टोकियो आलिम्पिकमध्ये हारली. मनुने त्यावेळी कोच जसपाल राणा यांना दोष दिला होता. यावर बोलताना जसपाल यांनी मनुची अपरिपक्वता असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर दोघांचेही रस्ते वेगळे झाले. मनुने एक टॅटू गोंदवला होता ज्यावर स्टील आय राईज असं लिहिलं होतं. मनु विदेशात जाण्याचा विचार करण्याचा विचार करत होती. मात्र तिचं स्वप्न तिला रोखत होतं, शेवटी मनुने पॅरिस ऑलिम्पकच्या एक वर्षाआधी परत एकदा कोच जसपाल राणा यांनाच फोन केला. जसपाल यांनी तिला नकार दिला नाही. पुन्हा सरावाला सुरुवात झाली.आता पदक जिंकल्यावर जसपाला राणा पुन्हा कोच होण्यासाठी का तयार झाले? यावर बोलताना, मनुला नकार दिला नाही कारण तिच्यामध्ये इतिहास रचण्याची क्षनता असल्याचं माहिती असल्याचं जसपाल राणा म्हणाले.
मनु भाकरची आई तिला ‘झाँसी की राणी’ असं बोलतात कारण मनुचा ज्या दिवशी जन्म झाला होता. त्या दिवशीच तिच्या आईल शिक्षक पात्रता चाचणी करण्यासाठी जावं लागलं. मनु भाकरच्या आई चाचणी देऊन माघारी आल्या पण मनु आई नाही म्हणून रडली नाही उलट खेळत होती. त्यामुळे मनु असं तिचे नाव ठेवले गेले. मनु या शब्दाचा अर्थ ‘झाँसी की राणी’ असाही होतो. मनु भाकर हिने आपली पहिली नॅशनल टूर्नामेंट भाड्याने पिस्तुल घेऊन ती खेळली होती. पिस्तुलच्या लायसन्ससाठी तिच्या वडिलांनी खूप संघर्ष केला. राम किशन रोज 45 किमी जावं लागत होतं, शेवटी त्यांनी हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि शिक्षणमंत्री यांना विनंती केली. दोन महिन्यांनी त्यांना लायसन्स मिळालं होतं.
मनु भाकरला रौप्य पदक मिळवण्याची संधी होती, मात्र ती थोडक्यात हुकली. या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कोरियाच्या ओह ये जिन हीने सुवर्ण पदक मिळवलं. तर कोरियाच्या की ही किम येजी हीने रौप्य पदक पटकावलं. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाळी. दोघींच्या पॉइंट्समध्ये फक्त 2चा फरक होता. कोरियाच्या या दोघींनी अुनुक्रमे 243.2 आणि 241.3 असा स्कोअर केला. टोक्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनुच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मनुला फक्त 14 शॉट लावता आले. परिणामी मनु फायनलसाठी पात्र ठरली नाही. मात्र मनुने अथक प्रयत्नांनी तिने कांस्य पदक मिळवलंय.
मेडल जिंकल्यावर मनु भाकर हिने आपली पहिली प्रतिक्रिया देताना श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेली गोष्ट डोक्यात असल्याचं म्हटलं आहे. मी माझ्या सर्व शक्तीनिशी लढले, हे कांस्य आहे पण मला आनंद आहे की मी देशासाठी कांस्य पदक जिंकू शकले. मी गीता खूप वाचली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यानुसार कोणत्याही फळाची न अपेक्षा ठेवत कर्म करत रहायला हवं. फळाजी काळजी आपण करायची नाही. मीसुद्धा तेच केल्याचं मनु भाकर म्हणाली.
दरम्यान ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी राज्यवर्धन राठोडने रौप्य (2004) आणि अभिनव बिंद्रा याने (2008) मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर गगन नारंग आणि विजय कुमार या दोघांनी 2012 मध्ये सिलव्हर मेडल मिळवलं होतं. तर आता मनु भाकर या नेमबाजीत ऑलिम्पिक पदक मिळवणारी एकूण पाचवी भारतीय आणि पहिली महिला ठरली आहे.
मनु भाकरने ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय पातळीवर 22 पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य, एशियन गेम्समध्ये 1 सुवर्ण आणि वर्ल्डकप स्पर्धेत 9 सुवर्ण आणि 2 रजत पदक जिंकली आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत एक गोल्ड, युथ ऑलिम्पिक स्पर्धेत एक गोल्ड आणि एक सिल्व्हर पदक जिंकली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत 1 गोल्ड आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये 2 गोल्ड पदकांची कमाई केली आहे. मनु भाकर 3 ऑगस्टला 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भाग घेणार आहे तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा सर्व देशवासियांना असणार आहे.