Paris Olympic 2024 | सगळे विसरले पण सचिन नाही, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या मनु भाकरला शुभेच्छा देताना म्हणाला…

| Updated on: Jul 28, 2024 | 7:38 PM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनु भाकरने भारतासाठी पहिलं पदक जिंकलं. मनु भाकरचा प्रवास काही सोपा राहिला नव्हता. पदक जिंकल्यावर सचिन तेंडुलकरने खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Paris Olympic 2024 | सगळे विसरले पण सचिन नाही, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या मनु भाकरला शुभेच्छा देताना म्हणाला...
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतान आपलं पदकांंचं खातं उघडलं आहे. महिला खेळाडू मनु भाकर हिने 10 मीटर एयर पिस्तुलमध्ये कांस्यपदकाची कमाई करून दिलीये. भारतासाठी आनंदाचा असून मनु भाकर हिचे सर्व देशातून कौतुक होत आहे. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मनु भाकरने जिंकत शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने मनु भाकरचे कौतुक केलं आहे.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

भारताचे पदकातालिकेमध्ये खातं उघडलं असून तेही नेमबाजीत! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकल्याबद्दल मनू भाकरचे अभिनंदन. टोकियोमध्ये हर्ट् ब्रेक झाल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकण्यासाठी दृढनिश्चय दाखवला. आणि भारताचा अभिमान वाढवल्याचं सचिन तेंडुलकर याने ट्विट करत म्हटलं आहे.

मनु भाकरची हिची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. टोकियो 2020 साली पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणाऱ्या मनु भाकरची पिस्तुल फुटली होती. त्यामुळे 2020 साली संधी हुकल्यानंतर तिने खचून न जाता आपला सराव सुरू ठेवला. मनु भाकरला तेव्हा मोठा धक्का बसला होता. परंतु तिने दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कमबॅक केल्याचं सर्व देशवासियांनी पाहिलं.

 

मनु भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले. कोरियाच्या ओ ये जिनने 243.2 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक विक्रमही केला. कोरियाची किम येजी रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. त्याने 241.3 धावा केल्या. तिचे सुवर्ण कमी फरकाने हुकले. मनु भाकरने 221.7 गुण मिळवत कांस्यपदक मिळवलं.