‘मला अजूनही तो फोन कॉल आठवतोय…’; गोलकीपर ऑलिव्हर कानने सांगितला जीवनातील खास अनुभव!

| Updated on: Nov 25, 2023 | 6:18 PM

मला अजूनही तो कॉल आठवतोय, नंबर वन गोलकीपर होण्यासाठी बायर्न मुनिचकडून मला कॉल करण्यात आला होता. युवा खेळाडू आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऑलिव्हर कानने त्याच्या आयुष्यातील एक खास किस्सा सांगितला.

मला अजूनही तो फोन कॉल आठवतोय...; गोलकीपर ऑलिव्हर कानने सांगितला जीवनातील खास अनुभव!
Oliver Kahn G D Somanee International School (2)
Follow us on

मुंबई : क्रिकेटवेड्या भारतामध्ये द जर्मन वॉल म्हणून ओळखला जाणारा जर्मनीचा फुटबॉलपटू गोलकीपर ऑलिव्हर कान शुक्रवारी आलेला. मुंबईमधील जी डी सोमाणी शाळेला त्याने भेट दिली यावेळी शाळेतील मुलांनी त्याचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. युवा खेळाडू आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्याच्या आयुष्यातील एक खास किस्सा सांगितला. ज्यावेळी त्याने गोलकीपर म्हणून करियरला सुरूवात केली होती.

ऑलिव्हर कान याने मुलांना मार्गदर्शन करताना  आपल्या करियरच्या सुरूवातीच्या आठवणींना उजाळा दिला. ऑलिव्हर याने जर्मनीतील टॉप क्लब बायर्न मुनीचसाठी खेळतानाचा अनुभव कसा होता, याविषयीही त्यांनी सांगितलं. मला अजूनही तो कॉल आठवतोय, नंबर वन गोलकीपर होण्यासाठी बायर्न मुनिचकडून मला कॉल करण्यात आला होता. आधी मला कोणीतरी मस्करी करतंय असंच वाटलं. रेडिओवर कोणीतरी थट्टा करत असेल असं मला वाटलं होतं. पण तो माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं ऑलिव्हर याने सांगितलं.

करियरला सुरवात

माझ्या करिअरची खरी सुरुवात तेव्हाच झाली. पण बायर्नसोबतच्या चॅम्पियन लीगमध्ये आमचा पराभव झाला होता. तरीसुद्धा आम्ही हार मानली नाही आणि पुन्हा प्रयत्न केले. दोन वर्षांनंतर आम्ही पुन्हा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये पोहोचलो आणि तेव्हा बायर्नचा कप आमच्या नावावर करण्यात यश मिळाल्याचं ऑलिव्हर कान म्हणाला.

 

दरम्यान, ऑलिव्हरच्या स्वागतासाठी शाळेतील मुलांनी लेझीम खेळ करून दाखवला. तुतारी वाजवत त्याला पगडी घालत त्याचं जंगी स्वागत केलं. शाळेतील मुलांनी त्याची सहीची एकही संधी सोडली नाही. कानच्या भोवती गराडा घालत फुटबॉलवर तर कोणी आपल्या जर्सीवर त्याची सही घेतली. मार्गदर्शन करताना त्याने भारतीय मुलांना Never Give Up हा खास सल्ला दिला.