मुंबई : द जर्मन वॉल म्हणून ओळखला जाणारा जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू गोलकीपर ऑलिवर कान मुंबईत आले होते. ऑलिव्हर यांनी मुंबईमधील जी डी सोमाणी इंटरनॅशनल शाळेला भेट दिली. जर्मनीच्या दिग्गज खेळाडूचं शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीय पद्धतीने वाजग गाजत स्वागत केलं. ऑलिव्हर तब्बल 15 वर्षांनी भारतामध्ये आल्याने भारतीय फुटबॉलसाठी मोठी गोष्ट आहे. यावेळी ऑलिव्हर यांनी विद्यार्थांना संवाद साधताना फुटबॉलबाबत मार्गदर्शन केलं.
फुटबॉल या खेळात भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहे. इथल्या लोकांमध्ये फुटबॉलप्रती जी आवड आहे, ती अतुलनीय आहे. आता भारताने फुटबॉल या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे. भारताने या सुंदर खेळाशी आपली समृद्ध संस्कृती एकरुप करावी. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जागतिक स्तरावरील फुटबॉल या खेळात भारत लवकरच आपलं स्थान निश्चित करेल आणि वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेत सहभागी होईल, असं ऑलिव्हर कान यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Maharashtra | Legendary German goalkeeper, Oliver Kahn visited a school in Mumbai today and interacted with the students there. pic.twitter.com/pKCFfKosxz
— ANI (@ANI) November 24, 2023
या शाळेला भेट देणं हा अत्यंत विलक्षण अनुभव होता. मला कोलकातामधील माझ्या शेवटच्या खेळाची आठवण आली. तिथल्या लोकांची आणि चाहत्यांची आठवण आली. माझ्यासाठी ते निराशाजनक होतं. कारण तो माझा शेवटचा खेळ होता, दोन दशकं आणि इतक्या साऱ्या आठवणी. मला माझं तारुण्य आठवल्याचं कान यांनी सांगितलं.
फुटबॉल हा फक्त खेळ नाही, तो जगण्याचा एक मार्ग आहे. माझ्या करिअरमध्ये जी आव्हानं समोर आली, त्यामुळे मी चिकाटीचं महत्त्व काय असतं हे शिकलो. कधीही हार मानू का, हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि मी प्रत्येकाला ते स्वीकारण्यास सांगतो. जे सतत उत्कृष्ट काम करण्याच्या प्रयत्नात असतात, त्यांनाच यश प्राप्त होतं, असंही कान म्हणाले.