पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानच्या वाटेला एकमेव सुवर्ण पदक आलं आहे. भालाफेकपटू अरशद नदीमने विक्रमी फेक करत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे. अरशद नदीमने आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम फेकी केली. 92.97 मीटर लांब भाला फेकला. तर भारताच्या नीरज चोप्राने 89.45 मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक मिळवलं. तर ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसनने 88.54 मीटर लांब भाला फेकत कांस्य पदक मिळवलं. नीरज चोप्राने रौप्य पदक मिळवताच त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला आहे. केंद्र, राज्य सरकारांसोबत इतर ठिकाणांहून बक्षिसं मिळाली आहेत. मात्र दुसरीकडे, सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अरशद नदीमची थट्टा सुरु आहे. त्याला मिळाणारी बक्षिसं पाहून क्रीडाप्रेमींचा संताप होत आहे. इतक्या कठीण स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणं ही काय सोपी गोष्ट नाही. पण असं असूनही पाकिस्तान सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही.
पाकिस्तान सरकारकडून बक्षिसाच्या रुपाने एक नवी कार देण्यात आली आहे. या कारचा नंबरचं अरशदच्या पॅरिस ऑलिम्पिक रेकॉर्डशी खास कनेक्शन आहे. अर्शदने 92.97 मीटर लांब भाला फेकला होता आणि गाडीचा नंबर 9297 हा आहे. दुसरीकडे, अरशदला म्हैस गिफ्ट म्हणून मिळाल्याने हसं होत आहे. आता यात आणखी एक भर पडली आहे. पाकिस्तानमधील उद्योगपतीने अरशदला अल्टो कार गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या कंटेंट क्रिएटरने याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘जेडीसी फाउंडेशनचे फाउंडर जफर अब्बास यांनी अरशद नदीमला सुझुकी अल्टो कार गिफ्ट करण्याची घोषणा केली आहे.’ या बातमीनंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरु झालं आहे. काही युजर्संनी या पोस्टखालीच आपला राग व्यक्त केला आहे.
ALTO 😭😭 humare yaha to ab cab ke liye bhi aaj kal use nhi karte hai 🤣🤣
— प्रहलाद धाकड़ (@prahladdhaker99) August 12, 2024
Nadeem bhai ke size ki toh gaadi de do. Alto me toh ghutne ragad jayenge
— Oye Bala (@OyeBala) August 12, 2024
एका युजर्सने लिहिलं आहे की, अल्टो आमच्याकडे आता कॅबसाठीही वापरली जात नाही. तसेच रडणारे इमोजी टाकले आहेत. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, नदीमची शरीरयष्टी पाहून तरी गाडी गिफ्ट करायची. अल्टो गुडघे घासून जातील. अरशदने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी मेहनत घेतली. मात्र त्याच्या मेहनतीची पाकिस्तानमध्ये थट्टा सुरु आहे. त्याला मिळणारी बक्षिसं पाहून तरी असंच म्हणावं लागेल.