भारताच्या पारड्यात आणखी एक पदक पडेल अशी आशा होती. पण लक्ष्य सेनकडून अपेक्षापूर्ती झाली नाही. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या पदरी निराशा पडली. बॅडमिंटनपटूने लक्ष्य सेनने मलेशियाच्या ली जी जियाला पहिल्या सेटमध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे विजय मिळवेल असं वाटत होतं. पण हाताला झालेल्या दुखापतीमुळे लक्ष्य सेन अस्वस्थ वाटत होतं. वारंवार हाताला पट्टी लावण्याची वेळ येत होती. याचा फायदा मलेशियाच्या बॅडमिंटनपटूने घेतला. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये 11-5 ने आघाडी घेतल्यानंतर 21-13 असा गेम जिंकला होता. हे अंतर कमी करणं मलेशियाच्या खेळाडूला जमलं नाही. पण उर्वरित दोन सेटमध्ये त्याने लक्ष्य सेनला तशी संधी दिली नाही.दु स-या गेममध्ये चुरशीची लढाई झाली होती. लक्ष्य सेनकडून चुका झाल्या आणि ली जी जियाने त्याला बॅकफूटवर ढकललं. दुसरा सेट 21-16 असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये मलेशियाच्या ली जी जियाने वर्चस्व गाजवलं. त्यामुळे विजय दूर जात असताना स्पष्ट दिसत होतं. तिसरा सेटमध्ये त्याने लक्ष्य सेनला 21-11 ने पराभूत केलं.
लक्ष्य सेनेचं पदक फक्त एका विजयाने हुकल्याने पदरी निराशा पडली. जर लक्ष्य सेनने विजय मिळवला असता तर भारताकडून अशी कामगिरी करणारा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला असता. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे पदक विजयाचं स्वप्न स्वप्नच राहिलं. आता लक्ष्य सेनेला पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चांगली तयारी करावी लागणार आहे. यासाठी त्याला चार वर्षे हा पराभव जवळ बाळगून मेहनत घ्यावी लागणार आहे.
लक्ष्य सेनने क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध सलग दोन सेटमध्ये पराभूत कत गटात अव्वल स्थान पटकावले होते. 16 च्या फेरीत सेनने आपल्या देशातील एचएस प्रणॉयचा 21-12, 21-6 असा पराभव केला. त्यानंतर पुढच्या फेरीत कठीण आव्हान असलेल्या चायनीज तैपेईच्या चौ तिएन-चेनला पराभूत केले. सेनने त्याला 19-21, 21-15, 21-12 असं पराभूत केलं. ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा लक्ष्य सेन हा पहिला भारतीय ठरला होता. पण जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने त्याला 20-22, 14-21 ने पराभूत केलं.