पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला दोन पदके जिंकून देणाऱ्या मनु भाकरचे सर्व देशभरात कौतुक होत आहे. मनु भाकरने दोन कांस्यपदके जिंकली होतीत. 25 मीटर एअर पिस्तुलच्याही अंतिम फेरीमध्ये मनु भाकरने धडक मारली होती. मात्र तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे भारताचं आणखी एक पदक हुकलं. अशातच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मु भाकर हिचे कोच समरेश जंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर घरावर बुलडोजर चालवला जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या भूमी आणि विकास कार्यालयाने (LNDO) मनु भाकर यांचे कोच ज्या ठिकाणी राहतात ती जागा संरक्षण मंत्रालयाचे आहे. समरेश जंग जिथे राहत आहेत ती जागा बेकायदेशीर असून तिथली घरे दोन दिवसात पाडली जातील, असं सांगितलंय. याबाबत समरेश जंग यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे.
समरेश जंग हे पॅरिस ऑलिम्पिकवरून माघारी परतलो आणि संध्याकाळी हे समजल्यावर मलाच धक्का बसल्याचं समरेश जंग म्हणाले. तुम्हाला कारवाई करायची असेलत तर करा पण ती योग्य पद्धतीने करावी. लोकांना वेळ द्यायला हवा कारण एक दिवसात घर कसंकाय खाली करू शकतो, असा सवाल समरेश जंग म्हणाले.
After the euphoria of Indian shooters winning two Olympic medals, I the team coach just returned home from the Olympics to the disheartening news that my house and locality is to be demolished in 2 days.
— Samaresh Jung (@samareshjung) August 1, 2024
दिल्लीतील सिव्हिल लाइन्समध्ये असलेल्या खैबर पास कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये आणि संकक्षण मंत्रायामध्ये मोठा वाद सुरू होता. ती जागा संरक्षण मंत्रालयाची असल्याचा निर्णय दिल्ली उच्चन्यायालयाने जुलैमध्ये दिलेला. त्यानंतर आता नोटीस पाठवण्यात आली आहे.