‘ऑलिम्पिकमध्ये तिरंगा वरती गेला तेव्हा…’; मराठमोळा स्वप्नील कुसाळे मनातलं बोलला, Video एकदा पाहाच

| Updated on: Aug 03, 2024 | 6:48 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील मराठमोळा खेळाडू स्वप्नील कुसाळे याने इतिहास रचला आहे. 72 वर्षांनंतर महाराष्ट्रातील खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे. स्वप्नीलने पॅरिसमध्ये टीव्ही 9 मराठीसोबत संवाद साधला त्यावेळी पाहा तो काय म्हणाला.

ऑलिम्पिकमध्ये तिरंगा वरती गेला तेव्हा...; मराठमोळा स्वप्नील कुसाळे मनातलं बोलला, Video एकदा पाहाच
Follow us on

भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदक पटकात इतिहास रचला. मराठमोळा स्वप्नील थ्री पोझिशन प्रकारामध्ये पदक जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. महाराष्ट्राचे ऑलिम्पिकमध्ये नाव उंचावणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय. मनु भाकरनंतर वैयक्तिक पदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू आहे. महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांच्यानंतर पदक जिंकता आलं नव्हतं. मात्र 72 वर्षांनी कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने ही कामगिरी करून दाखवली. पदक जिंकल्यानंतर टीव्ही9 मराठीसोबत बोलताना पाहा स्वप्निल काय म्हणाला?

मॅच खेळताना बाहेर काय चाललं आहे त्यावेळी मी सर्वकाही विसरून फक्त मॅचवर लक्ष देतो कारण तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी भाग्यवान समजतो संपूर्ण देशवासियांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि पाठिंबा दिला. ज्यावेळी भारताचा तिरंगा वर जात होता तेव्हा डोळ्यामध्ये अश्रू आणि मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते. आपण विदेशात आपल्या देशाच झेंडा उचावला, असं ऑलिम्पिकपदक विजेता स्वप्नील कुसाळे म्हणाला.

 

स्वप्निलची आई अनिता कुसाळे या सरपंच, वडील आणि दोन्ही भाऊ हे शिक्षक आहेत. स्वप्निल राज्य सरकारच्या प्रबोधनी योजनेचा नेमबाज आहे. स्वप्निल 2009 पासून बालेवाडीत सराव करत आहे. स्वप्निल 2013 पासून दीपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनात शिकत आहे.

स्वप्निल हा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा आहे.  स्वप्निल कुसाळे याला महाराष्ट्र सरकारने 1 कोटी रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. याबाबत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यासोबतच त्याचा सत्कारही करणार असल्याचं शिंदे म्हणाले होते.

स्वप्निलचं हे यश ग्रामीण भागातील तरुणांना निश्चितच प्रेरणादायी असल्याचा आता ग्रामस्थांना वाटतंय, इतकच नाही तर स्वप्निल कोल्हापूरमध्ये येतात त्याची हत्तीवरून मिरवणूक काढू अशा शब्दात ग्रामस्थांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.