पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या युगांडाची एथलीट्स रेबेका चेप्टेगईचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. कारण तिच्या मृत्यूचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड आहे. रेबेकाच्या बॉयफ्रेंडने तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. यात तिचं शरीर 75 टक्के भाजलं. त्यामुळे तिला केनियाच्या एका रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केलं होतं. उपचारांना तिने साथ दिली नाही आणि प्राणज्योत मालवली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रेबेकाने भाग घेतला होता. तसेच 44 व्या क्रमांकावर राहिली होती. रेबेका मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 14व्या स्थानावर होती. तसेच 2022 मध्ये थायलंडमध्ये आयोजित वर्ल्ड माउंटेन अँड ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता.द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, रेबेकाचा बॉयफ्रेंड आणि तिच्यात एका जमिनीवर वाद सुरु होता. या घटनेमुळे रेबेकाच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तिच्या वडिलांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी काली आहे.
रेबेकाच्या मृत्यूमुळे युगांडामध्ये शोक व्यक्त होत आहे. इतकंच काय तर बॉयफ्रेंड कठोर कारवाई व्हावी यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेवर युगांडा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष डॉनल्ड रुकारे यांनी सांगितलं की, ‘आम्हाला दु:खद बातमी मिळाली आहे की आमची एथलीट रेबेका चेपटेगडी आता या जगात नाही. आम्ही तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो.’
We have learnt of the sad passing on of our Olympic athlete Rebecca Cheptegei OLY following a vicious attack by her boyfriend. May her gentle soul rest in peace and we strongly condemn violence against women. This was a cowardly and senseless act that has led to the loss of a… pic.twitter.com/V8Mog3oMOX
— Donald Rukare (@drukare) September 5, 2024
रेबेकाच्या आधीही दोन एथलीट्सची हत्या झाली आहे. एग्नेश टिरोपा आणि डामारिस मुटुआ यांची हत्या झाली आहे. या दोन्ही प्रकरणात जवळच्या लोकांना पोलिसांनी दोषी धरलं आहे. टिरोपाच्या हत्येप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल आहे. तर मुटुआच्या हत्येप्रकरणी तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेतला जात आहे.